वाचा-
संकट आले तर ते चारही बाजूंनी येते असे म्हणतात. अशीच अवस्था आफ्रिकेतील या खेळाडूची झाली आहे. आफ्रिकेकडून प्रथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्या सोलो गेल्या एक वर्षापासून गुलियन बेरी सिंड्रोम या आजाराशी लढत आहे. या आजारात रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. सोलोची यकृत आणि किडनी खराब झाली आहे. अशातच त्याला करोना व्हायरसची लागण झाली.
वाचा-
२६ वर्षीय या क्रिकेटपटूने स्वत: ट्विटकरून ही माहिती दिली. गेल्या वर्षी मला जीबीएस झाला होता. गेल्या १० महिन्यांपासून मी त्याच्या विरुद्ध लढत आहे. मी जवळपास ठीक झालो होतो त्यात मला टीबी झाला. माझे यकृत आणि किडनी खराब झाली आहे. आता मला करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मला कळत नाही की हे माझ्यासोबत काय होतय.
वाचा-
जीबीएसमुळे स्कॉटलंड दौऱ्यावर असताना सोलो कोमामध्ये गेला. चार आठवड्यांनी तो शुद्धीवर आला. हा आजार होणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. याआधी पाकिस्तानचा जफर सरफराज आणि स्कॉटलंडचा माजिद हक यांना जीबीएस आजार झाला होता.
वाचा-
सोलोला आफ्रिकेच्या संघाने ३ हजार ३०० अमेरिकी डॉलरची मदत केली. तसेच त्याला मदत करण्यासाठी कॅपेन चालवले. सोलोने प्रथम श्रेणीत ३६ सामन्यात ६० विकेट तर ५ अर्धशतकांसह ७३५ धावा केल्या. तो आफ्रिकेच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळला आहे. २०१२च्या १९ वर्षाखालील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सोलो खेळला होता. टी-२०त त्याने ३४ सामन्यात ३१ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times