कराची: पुण्यातील एका क्रिकेटच्या संग्रहालयाने पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अजहर अलीची बॅट विकत घेतली आहे. अजहर अलीने ही बॅट लिलावासाठी ठेवली होती. पुण्यातील Blades of Glory Cricket Museumने या बॅटची खरेदी केली.

वाचा-
करोना व्हायरसशी लढण्यासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने अजहरने बॅटचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी ही अनेक क्रिकेटपटूंनी त्याच्याकडील वस्तूंचा लिलाव केला आहे. पाकिस्तान संघाच्या या कर्णधाराने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३०२ धावांची खेळी केली होती. त्याशिवाय अजहरने २०१७ सालच्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील टी-शर्टचा लिलाव केला. या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकने मोठी धावसंख्या उभी केली आणि विजय मिळवला.

वाचा-
अजहरने बॅट आणि जर्सी या दोन गोष्टींवर संघातील सर्व खेळाडूंची सही घेतली होती. त्याने सोशल मीडियावर या दोन्हींची सुरुवातीची किमत १० लाख पाकिस्तानी रुपये इतकी ठेवल्याचे सांगितले. बॅटची विक्री बेस प्राइसला झाली. तर चॅपियन्स ट्रॉफीतील जर्सीला १.१ मिलियन पाकिस्तानी रुपये इतकी किमत मिळाली.

वाचा-
अजहरने सोशल मीडियावरून पुण्यातील ने बॅटची खरेदी केल्याचे सांगितले. तर कॅलिफोर्नियातील मुळच्या पाकिस्तानी व्यक्तीने जर्सी विकत घेतली. अजहर क्रिकेटमधील पहिला असा खेळाडू आहे ज्याने डे-नाइट कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले.

याआधी भारतीय संघातील केएल. राहुल, इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलर यांनी त्यांच्याकडील क्रिकेटमधील गोष्टींचा लिलाव करून करोनाग्रस्तांसाठी पैसे गोळा केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here