या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी भारतीय सघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास एक ते दीड महिना राहावे लागणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलियाला काळजी घ्यावी लागेल. पण या दौऱ्याच्या पूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंबाबत एक पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
सध्याच्या घडीला भारताचे सर्व क्रिकेटपटू हे आपल्या घरातच आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना खेळाडूंना सरावही करता येत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
याबाबत बीसीसीआयचे सचिव अरुण धुमाल यांनी सांगितले की, ” खेळाडूंना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी १४ दिवस क्वारंटाईन करावे लागणार आहे. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण क्रिकेट तर सुरु करावेच लागेल. त्यासाठी जी काही पाऊले उचलायची आहे ती बीसीसीआयला उचलावी लागतील. ”
भारत ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. पण आता या मालिकेत अजून एक सामना वाढवून पाच लढतींची मालिका खेळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा मानस दिसत आहे. याबाबत धुमाल म्हणाले की, ” सध्याच्या घडीला यावर भाष्य करणे घाईचे ठरेल. कारण या मालिकेला अजूनही बराच अवधी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आपले उत्पन्न वाढवायचे आहे. त्यासाठी त्यांनी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचा विचार करायला हवा. पण या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची सध्या तरी ही वेळ नाही. कारण या गोष्टीला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी कालांतराने ठरवण्यात येऊ शकतील. सध्याच्या घडीला हा दौरा होण्यासाठी कोणती पावले उचलायची आहे, याचा विचार आम्ही करत आहोत.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times