याबाबत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाल यांनी सांगितले की, ” या वर्षी तरी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे कठीण दिसत आहे. कारण लॉकडाऊननंतर एवढ्या सर्व संघाना एकत्रितपणे आणणे आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवणे, हे नक्कीच सोपे काम नाही. त्यामुळे या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक होईल, असे मला वाटत नाही.”
भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, ” सध्याची परिस्थिती पाहता ट्वेन्टी-२० विश्वचषक या वर्षी खेळवला जाईल, असे मला तरी वाटत नाही. मला तरी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन या वर्षी होईल, असे मला वाटत नाही. कारण ट्वेन्टी-२० विश्वचषकातील देशांना एकत्रिकपणे खेळायला आणणे ही सोपी गोष्ट नाही.”
तो पुढे म्हणाला की, ” ट्वेन्टी-२० विश्वचषक या वर्षी होईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेने क्रिकेटच्या कॅलेंडरला सुरुवात होऊ शकते. मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला नक्कीच आवडते. गेल्यावेळी आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलो होतो आणि आमच्यासाी तो एक अविस्मरणी क्षण होता. त्यावेळी आमच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता आगामी दौऱ्याबाबत ़मला उत्सुकता आहे. मला आशा आहे की, दोन्ही क्रिकेट मंडळं याबाबत योग्य तो निर्णय घेतील.”
ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यांनंतर भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहे. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला बीसीसीआयने हिरवा कंदील दिल्याचे समजत आहे. पण याबाबत अधिकृत कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. या दौऱ्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाईल, असे बीसीसीआयने आज सांगितले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times