करोना व्हायरसमुळे क्रिकेटचे नुकसान झाले असले तरी आता यामधून बाहेर पडण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. आयपीएल या वर्षी होईल, अशी बीसीसीआयला आशा आहे. त्यामुळेच त्यांनी ही लीग अजूनपर्यंत रद्द केलेली नाही. पण बीसीसीआय यावेळी आयपीएलने आपल्या नव्या मोसमाची सुरुवात करणार नाही, तर त्यापूर्वी एक स्पर्धा खेळवण्याचा मानस बीसीसीआयचा आहे.

भारतामध्ये सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन संपल्यावर बीसीसीआय आयपीएलबाबतचा निर्णय घेईल. आयपीएल यावर्षी २९ मार्चला सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे आता आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण आयपीएल रद्द करण्याचा निर्णय मात्र बीसीसीआयने घेतलेला नाही.

बीसीसीआयटने थेट आयपीएल सुरु न करता एक स्पर्धा खेळवण्याचा विचार केला आहे. या स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटपटूंना चांगलाच सराव करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर देशात चांगले क्रिकेटचे वातावरण तयार होईल आणि या सर्व गोष्टींचा फायदा आयपीएलला मिळू शकेल. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलपेक्षा सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा पहिल्यांदा खेळवण्याचे ठरवले आहे. बऱ्याच वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धा सुरु आहे आणि या स्पर्धेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर बीसीसीआय या स्पर्धेच्या तयारीला लागणार असल्याचे समजत आहे. याबाबतचे वृत्त मुंबई मिरर या दैनिकाने दिले होते.

करोना व्हायरसमुळे बीसीसीआयचे नुकसान झाले आहे. आता हे नुकसान लवकर भरून काढायचे असून यासाठी बीसीसीआयने नवीन शक्कल लढवली आहे. त्यानुसार भारताचे दोन वेगवेगळे संघ केले जातील. एक संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल, तर दुसऱ्या संघापुढे इंग्लंडचे आव्हान असेल. त्यामुळे बीसीसीआयचे उत्पन्न वाढेल आणि नुकसान भरून काढता येईल. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती प्रसारीत केली होती. त्यानुसार भारताचे दोन संघ एकाच वेळेला खेळतील. एक संघ ऑस्ट्रेलियाबरोबर कसोटी सामना खेळेल, त्यापूर्वी दुसरा संघ इंग्लंडबरोबर ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय सामना खेळू शकतो. त्यामुळे जेव्हा क्रिकेट सुरु होईल, तेव्हा चाहत्यांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे.

भारताने जर दोन संघ तयार केले तर त्यांना किमान ३० खेळाडू लागतील, त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही दुप्पट लागेल. त्याचबरोबर एकाच संघात सर्व दमदार खेळाडू असू शकणार नाहीत, कारण दोन्ही संघांमध्ये समतोल ठेवावा लागेल. याचा विचार बीसीसीआय आणि निवड समितीला करावा लागणार आहे. पण जर हे दोन संघ खेळवले गेले तर त्यांचे कर्णधारपद कोणाकडे असेल, याची उत्सुकता सर्वांना असेल.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळेल तेव्हा विराट कोहली हा भारताने नेतृत्व करेल. दुसरीकडे जेव्हा भारताचा संघ इंग्लंडबरोबर ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय सामने खेळेल तेव्हा भारताचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवण्यात येऊ शकते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here