करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला लॉकडाऊन सुरु आहे. या काळात मुंबई पालिकेच्या शाळेतील चार हजार मुलांना अडचण येत होती. पण या चार हजार मुलांच्या मदतीसाठी आता सचिन धावून आला आहे. सचिनने या चार हजार मुलांची मदत केली आहे.
काही लोकांना आपण किती दान करतो, हे गुप्त ठेवायला आवडते. आता चार हार मुलांचा खर्च उचलायचा तर किती रक्कम लागेल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. पण ही रक्कम फार मोठी असेल, एवढे मात्र नक्कीच. पण सचिनने या मुलांना मदत करताना आपण किती दान करत आहोत, हे मात्र गुप्त ठेवले आहे.
सचिनने या चार हजार मुलांना मदत करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. हाय-फाय असे या स्वयंसेवी संस्थेचे नाव आहे. या संस्थेच्या माध्यमातून सचिन या चार हजार गरजू मुलांपर्यंत आपली मदत पोहोचवणार आहे. या संस्थेने एक ट्विट केले आहे. यामध्ये सचिनने चार हजार मुलांना मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे, असे म्हटले गेले आहे. सचिननेही हे ट्विट रीट्विट केले आहे. त्यामुळे आता लोकांना सचिनबाबतही ही माहिती मिळाली आहे.
सचिन नेहमीच लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे आल्याचे आपण पाहिले आहे. सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे. या काळात सर्व गोष्टी मिळणे कठीण आहे. त्यामुळे काही लोकांना समस्या जाणवत आहेत. पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या काही मुलांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असते, त्यांना आता सचिनने मदतीचा हात पुढे केला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times