सध्याच्या घडीला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहा ही चांगलीच चर्चेत आली आहे. आता तर ती लोकांवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे. मला कोणी अडवू शकत असाल तर अडवून दाखवा, असे आव्हानच तिने लोकांना दिले आहे.

काही दिवसांपूर्वी हसीनने आपले काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते. पण हसीन या लोकांना घाबरणारी नाही. हसीनने आता तर चक्क तीन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओखाली तिने काही कमेंटही केल्या आहे.

एका व्हिडीओखाली तिने कोणी अडवू शकत असाल तर अडवून दाखवा, अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या व्हिडीओवर तिने, जेव्हा हत्ती चालत असतो तेव्हा कुत्रे त्याच्यावर भुंकत असतात, असे म्हटले आहे. तिसऱ्या व्हिडीओमध्ये तिने, मी आग लावली आहे तुम्हा जळत राहा, असे लिहिले आहे.

काही दिवासंपूर्वी हसीनने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. शमीचे दुसऱ्या बायकांबरोबर शारिरीक संबंध आहेत, असे हसीनेन म्हटले होते. त्याचबरोबर तिने शमीची तक्रारही केली होती. त्यानुसार न्यायालयात केसही सुरु आहे. त्यानंतर हसीन आता शमीबरोबर राहत नाही.

हसीनने एक अभिनेत्री बनायचे होते. आयपीएलमध्ये ती चीअर गर्ल म्हणून काम करत होती. तिथेच हसीन आणि शमीची भेट झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केले. आता त्यांना एक मुलगीही आहे. पण हसीनने गंभीर आरोप केल्यानंतर मात्र आता शमी तिच्याबरोबर राहत नाही.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे भारतामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणालाही सहसा बाहेर फिरता येत नाही. या काळात सेलिब्रेटी घरी बसूनच व्हिडीओ बनवत आहे. हे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळते हसीननेही हीच गोष्ट करायचे ठरवले आहे. पण गेल्या काही गोष्टी पाहता लोकांमध्ये हसीनबद्दल नाराजी आहे. त्यामुळे लोकं हसीनला ट्रोल करत असतात.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here