पाहा –
काही दिवासांपूर्वी रैना म्हणाला होता की, मला संघा बाहेर का ठेवले याचे कारण निवड समितीने सांगितले नाही. माझ्याकडून नेमक त्यांना काय अपेक्षित आहे. मी कोणते टार्गेट पूर्ण करू ज्यामुळे टीम इंडियात माझे पुनरागमन होईल.
वाचा-
रैनाच्या या वक्तव्यावर निवड समितीचे माजी प्रमुख यांनी उत्तर दिले होते. रैनाच्या खराब कामगिरीमुळे तो संघाबाहेर होता. यासंदर्भात मी स्वत: त्याच्याशी बोललो आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी केली नाही. त्यामुळेच संघात निवड झाली नसल्याचे सांगितले आहे. पुन्हा संघात स्थान मिळवण्यासाठी मी रोडमॅप दिला होता आणि तेव्हा रैनाने माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले होते, असे प्रसाद म्हणाले.
वाचा-
शनिवारी रैना आणि माजी गोलंदाज इरफान पठाण यांनी इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅट केले. या चॅटमध्ये त्यांनी प्रसाद यांनी केलेला दावा खोडून काढला. प्रसाद म्हणत आहेत की माझी कामगिरी चांगली नव्हती आणि त्यामुळे मी संघाबाहेर झालो. यावर ते माझ्याशी बोलले असल्याचा दावा करत आहेत. पण अशा प्रकारची कोणतीही चर्चा आमच्यात झाली नाही, असे रैनाने सांगितले.
रैना २०११ च्या वर्ल्ड कप आणि २०१३च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात होता. त्याने २०१८ मध्ये भारतीय संघाकडून अखेरचा टी-२० आणि वनडे सामना खेळला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times