नवी दिल्ली: मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे. करोना व्हायरस नसता तर आयपीएलचा १३वा हंगाम आता पिकवर असता. कारण नियोजित वेळेनुसार २९ मार्चपासून सुरू होणार होती आणि २४ मे रोजी फायनल सामना होणार होता. असे झाले असते तर आता क्वालीफायर मॅच खेळण्यासाठी कोणत्या संघाला किती सामने जिंकावा लागतील आदी चर्चा सुरू असत्या. पण करोनाने सर्व काही बिघडवले.

वाचा-
बीसीसीआयने ही स्पर्धा प्रथम १४ एप्रिलपर्यंत स्थगित केली होती. पण त्यानंतर करोना संकट वाढल्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. जोपर्यंत सरकारकडून परवानगी मिळत नाही तोपर्यंत स्पर्धा होणार नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भविष्यात ही स्पर्धा होईल की नाही याबद्दल कोणी सांगण्यास तयार नाही. दरम्यान, आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने दाखवली होती. लंकने बीसीसीआयला तशी ऑफर दिली होती. अर्थात बीसीसीआयने या ऑफरमध्ये फारसा रस दाखवला नाही. आता लंकेनंतर आणखी एका देशाने आयपीएलचे आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे.

वाचा-
युएईने बीसीसीआयला IPL स्पर्धा घेण्याची ऑफर दिली आहे. करोना संकटामुळे यावर्षी स्पर्धा परदेशात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी देखील ही बाब मान्य केली आहे.

वाचा-
अर्थात बीसीसीआयने श्रीलंका असो की युएई या दोन्ही देशांच्या ऑफरवर कोणताही विचार केला नाही. कारण कोणत्याही मोठ्या देशात अद्याप क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. अद्याप आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सुरू झालेली नाही. त्यामुळे असा निर्णय घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अरुण धूमल यांनी सांगितले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here