नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने केलेल्या एका वक्तव्याला १६ वर्षानंतर खोट असल्याचे म्हटले आहे. सेहवागला ज्या खेळीमुळे ‘मुल्तान के सुलतान’ असे नाव मिळाले होते त्या सामन्यातील हा किस्सा आहे.

पाहा-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मार्च-एप्रिल २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता. या सामन्यातील एक किस्सा सेहवागने सांगितला होता. सामन्यात मी त्रिशतकाच्या आसपास होतो आणि मला पाहून तो कंटाळला होता. त्यामुळे तो वारंवार शॉर्ट चेंडू टाकत होता आणि हुक मारके दिखा, हुक मारके दिखा असे सांगत होता. तेव्हा सेहवागने मैदानावर असलेल्या सचिन तेंडुलकरकडे इशारा केला. अख्तरने सचिनला शॉर्ट चेंडू टाकल्यावर सचिनने त्यावर षटकार मारला. तेव्हा सेहवागने अख्तरला सांगितले की, बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है.

वाचा-

पाहा काय म्हणाला होता सेहवाग…

आता १६ वर्षानंतर अख्तरने सेहवागने सांगितलेला हा किस्सा खोटा असल्याचे म्हटले. मुल्तान कसोटीत असे काहीच झाले नव्हते. मी कधीच सेहवागला हुक मारण्यास सांगितले नाही. यावर २०११ साली मी सेहवागला गंभीर समोर विचारणा देखील केली. तेव्हा त्याने देखील मान्य केली की, मी असे काही बोललो नाही.

वाचा-
सेहवाग आणि गंभीर दोघेही चांगले आहेत. पण टिव्हीवर बोलताना त्यांच्याकडून काही तरी बोलले जाते, असे अख्तर म्हणाला.

भारत-पाक यांच्यात २८ मार्च २००४ रोजी सुरू झालेल्या कसोटी सामन्यात सेहवागने ३०९ धावांची खेळी केली होती. तर सचिन तेंडुलकरने नाबाद १९४ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५ बाद ६७५ धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव ४०७ धावांवर तर दुसरा डाव २१६ धावांवर संपुष्ठात आला. भारताने हा सामना ५२ धावांनी जिंकला होता.

पाहा आता १६ वर्षानंतर अख्तर काय म्हणाला…

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here