जेव्हा स्पर्धा सुरु असतात तेव्हा क्रमवारी बदललेली आपण सर्वच पाहतो. एखादा संघ खाली तर एखादा संघ वर जात असतो. पण सध्याच्या घडीला कोणीतीही क्रिकेट स्पर्धा सुरु नसताना भारताने अव्वल स्थान गमावल्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. यावेळी नेमका कोणता निकष आयसीसीने लावला, हे कोडे चाहत्यांना पडलेले आहे.
याबाबत गंभीर म्हणाला की, ” ऑस्ट्रेलियाला नेमक्या कोणत्या गोष्टीच्या आधारावर आयसीसीने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान दिले आहे. आशिया खंडात तर त्यांची कामगिरी चांगली झालेली पाहायला मिळालेली नाही. भारतीय संघ तब्बल ४२ महिने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थनावर होता. पण आयसीसीने आपल्या नियमांत बदल केला आणि भारताला अव्वल स्थान गमवावे लागले. या नियमांत बदल केल्यानंतर भारतीय संघ पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर गेला, तर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला.”
आयसीसीने या रँकिंग सिस्टमला २०१६-१७ साली काढून टाकले होते. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. पण आयसीसीच्या नव्या नियमांचा फटका भारतीय संघाला बसला आहे. पण हे नियम नेमके आहेत तरी काय आणि भारताला कोणत्या गोष्टीचा फटका बसला, हेदेखील गंभीरने सांगितले आहे.
गंभीर पुढे म्हणाल की, ” भारती संघ पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला, याचे मला जास्त वाईट नाही. मला या गोष्टीचे आश्चर्य वाटत नाही. पण मला आयसीसीच्या नियमांवर विश्वास नाही. माझ्यामते कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात वाईट क्रमवारीचे नियम आहेत. तुम्ही घरच्या मैदानात जिंका किंवा परदेशात, तुम्हाला समानच गुण मिळतात. माझ्यामते ही गोष्ट फार वाईट आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times