वाचा-
कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त धावा कोणी केल्या हे सर्वांना माहित आहे. पण दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या याचे उत्तर मात्र फार कमी जणांना माहित असेल. वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने एका डावात नाबाद ४०० धावांचा विक्रम केला होता. पण एका कसोटीत सर्वाधिक धावांचा विक्रम लाराच्या नावावर नाही तर एका इंग्लंडच्या फलंदाजाच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फक्त चार फलंदाजांना दोन्ही डावात मिळून ४०० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत.
वाचा-
इंग्लंडचे फलंदाज ग्रॅहम गूच यांनी एका कसोटीतील दोन्ही डावात मिळून सर्वाधिक ४५६ धावा केल्या आहेत. गूच यांच्या नावावर हा विक्रम गेली ३० वर्ष कायम आहे. दोन्ही डावात मिळून ४५० हून अधिक धावा करणारे ते एकमेव फलंदाज आहेत.
वाचा-
गूच यांनी जुलै १९९० मध्ये लॉडर्स मैदानावर भारताविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ३३३ धाव तर दुसऱ्या डावात १२३ धावांची खेळी केली होती. अशा पद्धतीने त्यांनी दोन्ही डावात मिळून ४५६ धावांची सर्वोच्च खेळी केली. यानंतर दुसरा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरचा, पाकिस्तानविरुद्ध ऑक्ट्रोबर १९९८ साली टेलरने पहिल्या डावात ३३४ आणि दुसऱ्या डावात ९२ धावांसह एका सामन्यात ४२६ धावा केल्या होत्या.
पाहा-
या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा. फेब्रुवारी २०१४ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात ३१९ तर दुसऱ्या डावात १०५ धावांसह ४२४ धावा केल्या. या यादीत चौथ्या स्थानावर आहे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा. त्याने एकाच डावात नाबाद ४०० धावा केल्या आहेत. लाराने इंग्लंडविरुद्ध ही विक्रमी खेळी केली होती. या यादीत एकाही भारतीय फलंदाजाचा समावेश नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times