भारतामध्ये करोना व्हायरसचे सावट आहे. करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये पोलिस आपली भूमिका चोख बजावताना दिसत आहेत. भारताचा माजी महान क्रिकेट़पटू सचिन तेंडुलकरने यावेळी पोलिसांसाठी एक ट्विट केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात सचिन बऱ्याच जणांना मदत करत आहे. सचिनने काही दिवसांपूर्वी चार हजार पालिकेच्या मुलांची जबाबदारी उचलली होती. त्याचबरोबर त्याने केंद्र आणि राज्य सरकारला मदतनिधीही दिला आहे. आता पोलिसांबद्दल सचिन नेमकं काय बोलला आहे, ते जाणून घेऊया…

पोलिसांबद्दल सचिन म्हणाला की, ” महाराष्ट्र पोलिस आणि देशभरातील सर्व पोलिसांना माझ्याकडून धन्यवाद. तुम्ही 24/7 न थकता काम करत आहात. त्यामुळएच आम्ही सर्व सुरक्षित आहोत.”

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला लॉकडाऊन सुरु आहे. या काळात मुंबई पालिकेच्या शाळेतील चार हजार मुलांना अडचण येत होती. पण या चार हजार मुलांच्या मदतीसाठी आता सचिन धावून आला आहे. सचिनने या चार हजार मुलांची मदत केली आहे. काही लोकांना आपण किती दान करतो, हे गुप्त ठेवायला आवडते. आता चार हार मुलांचा खर्च उचलायचा तर किती रक्कम लागेल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. पण ही रक्कम फार मोठी असेल, एवढे मात्र नक्कीच. पण सचिनने या मुलांना मदत करताना आपण किती दान करत आहोत, हे मात्र गुप्त ठेवले आहे.

सचिनने या चार हजार मुलांना मदत करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. हाय-फाय असे या स्वयंसेवी संस्थेचे नाव आहे. या संस्थेच्या माध्यमातून सचिन या चार हजार गरजू मुलांपर्यंत आपली मदत पोहोचवणार आहे. या संस्थेने एक ट्विट केले आहे. यामध्ये सचिनने चार हजार मुलांना मदत करण्याची जबाबदारी उचलली आहे, असे म्हटले गेले आहे. सचिननेही हे ट्विट रीट्विट केले आहे. त्यामुळे आता लोकांना सचिनबाबतही ही माहिती मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here