मुंबई: लॉर्ड्स मैदानावर २००२ मध्ये झालेल्या नेटवेस्ट ट्रॉफी स्पर्धेतील फायनल फक्त भारतीय संघासाठी नाही तर चाहत्यांसाठी देखील खास अशी आहे. भारताची आघाडीची फळी कोसळली असताना मोहम्मद शमी आणि युवराज सिंग यांनी संघाला शानदार असा विजय मिळवून दिला.

पाहा-
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर ३२६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली होती. तेव्हा युवराज आणि कैफ यांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी केली. कैफ आणि युवराजच्या करिअरमधील ही सर्वोत्तम अशी मॅच ठरली. या सामन्यातील अनेक व्हिडिओ तुम्ही याआधी पाहिले असतील. कैफ, युवराज यांची धमाकेदार बॅटिंग असेल की सौरव गांगुलीने विजयानंतर टी-शर्ट काढून केलेला जल्लोष.

वाचा- या खेळाडूने

भारताची आघाडीची फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर देखील गांगुली लॉर्ड्सच्या बाल्कनीतून सामना पाहत होता. कारण त्याला या दोन्ही फलंदाजांवर विश्वास होता.

कैफ आणि युवराज संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना. गांगुलीने कैफ इशारा करून एक धाव घेण्याचा इशारा केला. तेव्हा भारताला विजयासाठी ७१ चेंडूत ९१ धावांची गरज होती. पण कैफने पुढच्या चेंडूवर मिड विकेटला षटकार मारला. या शॉटसह कैफने आपण सामान जिंकूनच मैदानातून परत येऊ असा इशाला दिला. कैफच्या या शॉटचे गांगुलीने देखील टाळ्या वाजवून कौतुक केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताने हा सामना २ विकेटनी जिंकला. युवराजने ६९ तर कैफने नाबाद ८७ धावा केल्या होत्या. गांगुलीने विजयानंतर टी-शर्ट काढून हवेत फिरवला होता. गांगुलीचा तो जल्लोष आज देखील चाहत्यांना आठवतो.

नेटवेस्ट मालिकेआधी इंग्लंडने मुंबईत वनडे मालिका जिंकल्यावर अॅड्यू फ्लिंटॉफने वानखेडे मैदानावर टी-शर्ट हवेत फिरवला होता. गांगुलीने त्याला लॉर्ड्स मैदानावर उत्तर दिले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here