नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे क्रिकेट बंद असल्यामुळे खेळाडू घरी बसून काहीना काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर त्याचे आणि कुटुंबियांचे व्हिडिओ शेअर करत असतो. वॉर्नर हिंदी आणि दक्षिणेतील गाण्यांवर डान्स करतो. आता असाच एक व्हिडिओ आणखी क्रिकेटपटूने शेअर केला आहे. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने एआर रेहमानच्या गाण्यावर डान्स केला.

वाचा-
इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन सोशल मीडियावर सक्रीय असणारा खेळाडू आहे. नेहमी क्रिकेटवर बोलणाऱ्या पीटरसनने करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये टीकटॉकवरील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने एआर रेहमानच्या एका तमिळ गाण्यावर डान्स केला.

वाचा-
१९९३च्या ‘जेंटलमन’ चित्रपटातील ‘रूप सुहाना लगता है, चाँद पुराना लगता है…’ हा गाण्यावर पीटरसनने डान्स केला असून त्याचा हा व्हिडिओ रेहमानला आवडला आणि त्याने इंस्टाग्रामवर तो शेअर केला.

वाचा-

पीटरसनने काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली सोबत लाइव्ह चॅट केले होते. या चॅटमध्ये त्यांनी क्रिकेटमधील अनेक गोष्टींवर चर्चा केली आणि आयपीएल संदर्भात मते मांडली.

वाचा-
इंग्लंडच्या या क्रिकेटपटूने राष्ट्रीय संघाकडून १०४ कसोटीत ४७.२८ धावांसह ८ हजार १८१ धावा केल्या आहेत. पीटरसनच्या नावावर २३ शतकं आहेत. तर ११३६ वनडेत ४०.७३ च्या सरासरीने ४ हजार ४४० धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here