भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा किती शांत आहे, तुम्हाला सांगायला नको. त्यामुळेच धोनीला कॅप्टन कूल म्हणूनही ओळखले जायचे. पण एकदा धोनी चक्क बॅट मैदानात फेकून ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण हा किस्सा भारताच्याच एका खेळाडूने सांगितलेला आहे.

धोनी काही वेळी मैदानात रागावल्याचे पाहिले गेले आहे. एकदा धोनी २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादववर भडकल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलमध्येही धोनी दोनदा भडकल्याचे पाहायला मिळाले होते.

आयपीएलच्या २०१९ साली झालेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर सुरु होता. या सामन्यातील १९वे षटक वेगवान गोलंदाज दीपक चहर टाकत होता. या १९व्या षटकात चहरने दोन सलग नो बॉल टाकले होते. त्यावेळी धोनी चहरवर चांगलाच रागावलेला पाहायला मिळाला होता.

धोनी एकदा तर पंचांशी थेट मैदानात वाद घालण्यासाठी आला होता. हा सामना जयपूर येथे सुरु होता. या सामन्यात एकदा स्क्वेअर लेग येथे उभ्या असलेल्या पंचांनी आपला निर्णय बदलला होता. त्यांनी सुरुवातीला नो बॉल दिला होता. पण त्यांनी हा निर्णय त्यानंतर बदलला होता. त्यावेळी धोनी चक्क मैदानात पंचांशी वाद घालत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

धोनी एकदा बॅट फेकून ड्रेसिंग रुममध्ये गेला होता, हा किस्सा भारताचा माजी स्विंग गोलंदाज इरफान पठाणने सांगितला आहे. पठाण म्हणाला की, ” ही गोष्ट २००६-०७ या सालाची आहे. यावेळी सरावादरम्यान काही गोष्टी आम्हाला करायला सांगितल्या होत्या. जो उजव्या हाताने फलंदाजी करतो त्याने डाव्या हाताने फलंदाजी करावी, असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यावेळी संघातील काही खेळाडूंचे संघ बनवण्यात आले होते. त्यावेळी धोनी फलंदाजी करत होता. फलंदाजी करताना धोनी आऊट झाला, पण त्याला वाटले की, आपण नॉट आऊट आहोत. त्यामुळे धोनी रागावला आणि आपली बॅट फेकून ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. त्यानंतर सरावासाठीही तो उशिरा मैदानात आला होता. त्यामुळे धोनीला राग येतो, ही गोष्ट खरी आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here