सध्याच्या घडीला आयसीसीची एक पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टवर गांगुलीने आपल्या खास शैलीत प्रतिक्रीया दिली आहे.

आयसीसीने एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सचिन आणि सौरव यांनी सलामीला येत विश्वविक्रम रचला होता, या गोष्टीची आठवण करून दिली आहे. आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” सचिन आणि सौरव यांनी सलामीला १७६ सामने एकत्र खेळले. या १७६ सामन्यांमध्ये सचिन आणि सौरव यांनी ८२२७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही सलामीच्या जोडीा सहा हजार धावांचा पल्लाही ओलांडता आला नसल्याचे आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.”

आयसीसीच्या पोस्टवर सचिन काय म्हणाला…आयसीसीच्या या पोस्टवर सचिनने पहिल्यांदा प्रतिक्रीया दिली. सचिन या पोस्टबद्दल म्हणाला की, ” पुन्हा एकदा या जुन्या आणि सुंदर आठवणींना उजाळा मिळाला. जर आत्ताचे नियम असते, म्हणजे दोन नवीन चेंडू आणि चार क्षेत्ररक्षकांचे नियम असते तर आपण सौरव आपण किती धावा अजून केल्या असत्या.”

सचिनच्या पोस्टवर सौरवची प्रतिक्रीया…सचिनच्या पोस्टवर सौरवनेही आपली प्रतिक्रीया दिली आहे. सौरव म्हणाला की, ” आपण दोघांनी मिळून अजून चार हजार धावा जमवल्या असत्या… दोन नवीन चेंडू म्हणजे पहिल्याच ओव्हरवर कव्हर ड्राइव्ह मारण्यासारखी गोष्ट आहे.”

सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये काही नियम बनवण्यात आले आहेत आणि या नवीन नियमांनुळे फलंदाजांना चांगलाच फायदा मिळत आहे. सध्याच्या घडीला एका डावात दोन चेंडू वापरले जातात. त्यामुळे फलंदाजाला मोठे फटके मारणे सोपे जाते. त्याचबरोबर सध्याच्या घडीला एका डावात तीन पॉवर प्ले ठेवण्यात येतात. या पॉवर प्लेमध्ये जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर राहू शकत नाहीत. या नियमाचा चांगलाच फायदा फलंदाजांना होत असून त्यामुळेच सध्या धावा वाढल्याचेही म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here