वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी एकेकाळी भारतासाठी दमदार सलामी दिली होती. आता गंभीर आणि सेहवाग यांच्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तोफ डागली आहे.

काही दिवासांपूर्वी शोएबने सेहवागला खोटे ठरवले होते. सेहवाग जो किस्सा सांगतो, तसे काही घडलेले नाहीच. सेहवाग खोटं बोलत आहे, असे शोएबने म्हटले होते. यानंतर सेहवागने मात्र कोणतीही कमेंट केली नव्हती. आता शोएब सेहवागसह गंभीरवरही बरसला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शोएब हा भारत आणि भारताच्या क्रिकेटपटूंबाबत काही वक्तव्य करत आहे. आता त्याने सेहवाग आणि गंभीरला रडारवर घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. शोएबने गंभीर आणि सेहवाग यांच्यावर टीका करताना त्यांना शिविगाळही करणार होते, असेही म्हटले आहे.

शोएब म्हणाला की, ” गंभार आणि सेहवाग हे चांगले व्यक्ती आहेत. पण ते जेव्हा कधीही टेलिव्हिजनवर येतात, तेव्हा काहीही ते बरळतात. मीदेखील त्यांना शिव्या घालू शकतो किंवा वाईट शब्द वापरू शकतो. पण टेलिव्हिजनवर लहान मुलंही असतात, त्यांच्यावर वाईच परीणाम व्हायला नको, म्हणून मी त्यांना शिव्या देत नाही.”

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मार्च-एप्रिल २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता. या सामन्यातील एक किस्सा सेहवागने सांगितला होता. सामन्यात मी त्रिशतकाच्या आसपास होतो आणि मला पाहून तो कंटाळला होता. त्यामुळे तो वारंवार शॉर्ट चेंडू टाकत होता आणि हुक मारके दिखा, हुक मारके दिखा असे सांगत होता. तेव्हा सेहवागने मैदानावर असलेल्या सचिन तेंडुलकरकडे इशारा केला. अख्तरने सचिनला शॉर्ट चेंडू टाकल्यावर सचिनने त्यावर षटकार मारला. तेव्हा सेहवागने अख्तरला सांगितले की, बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है.

आता १६ वर्षानंतर अख्तरने सेहवागने सांगितलेला हा किस्सा खोटा असल्याचे म्हटले. मुल्तान कसोटीत असे काहीच झाले नव्हते. मी कधीच सेहवागला हुक मारण्यास सांगितले नाही. यावर २०११ साली मी सेहवागला गंभीर समोर विचारणा देखील केली. तेव्हा त्याने देखील मान्य केली की, मी असे काही बोललो नाही. सेहवाग आणि गंभीर दोघेही चांगले आहेत. पण टिव्हीवर बोलताना त्यांच्याकडून काही तरी बोलले जाते, असे अख्तर म्हणाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here