भारताचे पंत्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना मोदी यांनी काही गोष्टी सांगितल्या, तर भविष्यात काय करायचे, याबद्दलही त्यांनी आपले मत मांडले. लॉकडाऊनचे नेमके काय होणार, यावरही मोदींनी भाष्य केले. यावेळी मोदी यांच्या काही निर्णयाचे आयपीएलमधील महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स या संघाने स्वागत केले आहे.

भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. स्वावलंबी भारताची ही भव्य इमारत पाच खांबांवर आधारीत असेल, असंही त्यांनी आपल्या संबोधनात म्हटले. त्याचबरोबर लॉकडाऊनबाबत आगामी काही दिवसांमध्ये आपण घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लॉकडाऊन हे आतापेक्षा वेगळे असेल. त्यामध्ये चार नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असेही मोदी यांनी सांगितले. या निर्णयाचे स्वागत सीएसकेने केले आहे. याबाबत सीएसकेने एक ट्विट केले आहे. याट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आगामी लॉकडाऊनचे आपण हसतमुखाने स्वागत करायला हवे, असे सीएसकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

धोनी हा हसतमुख असतो, त्यानुसार सीएसकेने असे म्हटले असल्याचे बोलले जात आहे. कारण सीएसकेने हे ट्विट करताना धोनीचा हसतानाचा फोटो यामध्ये वापरला आहे.

मोदी यांनी २० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे, ही मदत लोकापर्यंत कशी पोहोचेल आणि त्याचे स्वरुप काय असेल, याबाबत आगामी काही दिवसांमध्ये घोषणा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर १८ मे रोजी लॉकडाऊन संपत आहे. पण यापुढेही लॉकडाऊन सुरु राहील, असे सुतोवाच मोदी यांनी यावेळी केले आहे. त्याचबरोबर आगामी लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील, हेदेखील त्यांनी सांगितले. पण या नवीन कोणत्या गोष्टी असतील, याचा उलगडा मात्र त्यांनी यावेळेला केलेला नाही. पण १८ मेपूर्वी मोदी याबाबतची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचवतील. मोदी यांनी काही दिवसांपूर्वी काही राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्याचबरोबर काही केंद्रीय मंत्र्यांबरोबरही त्यांनी चर्चा केल्याचे समजते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here