वाचा-
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथला ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाद करू शकते असे अख्तर म्हणाला होता. ICCने उत्तर दिले आहे. आज देखील ओव्हरमधील पहिले ३ चेंडू उत्तम बाऊंसर टाकून नंतर चौथ्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद करू शकते असे ट्वीट सोमवारी अख्तरने केले होते.
वाचा-
अख्तरच्या या ट्वीटला आयसीसीने मजेशीर उत्तर दिले. आयसीसीने तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोत मायकल जॉर्डन काही तरी वाचत आहे. दुसरा फोटो अख्तरच्या ट्वीटचा तर तिसऱ्या फोटोत जॉर्डने मोठ्याने हसत असल्याचे दिसत आहे.
वाचा-
क्रिकइन्फोने काही गोलंदाज आणि फलंदाज यांच्या लढती नाव सुचवले होते. यात अख्तर विरुद्ध स्थिम अशी लढत दाखवली होती. तर सचिन तेंडुलकर विरुद्ध अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान अशी लढत होती. अख्तरने क्रिकइन्फोच्या ट्वीटला उत्तर देताना स्मिथला चौथ्या चेंडूवर बाद करू शकते असे म्हटले होते.
अख्तरने ४६ कसोटी, १६३ वनडे आणि १५ टी-२० सामन्यातून अनुक्रमे १७८, २४७ आणि १९ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times