वाचा-
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मंगळवारी पुढील तीन वर्षाचा प्लॉन सांगितला. भारताला येणाऱ्या तीन पैकी किमान दोन वर्ल्ड कप जिंकावे लागतील. सुरेश रैनासोबत इस्टाग्रामवर लाइव्ह चॅट करताना रोहितने हा प्लॉन सांगितला. वर्ल्ड कप जिंकणे ही गोष्ट सोपी नाही, असे रोहित म्हणाला. दुसऱ्या बाजूला सुरेश रैनाने येणाऱ्या दोन पैकी एक वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असल्याचे सांगितले.
वाचा-
वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवणे हे सोपे नाही. ती एक वेगळी भावना आहे. सात-आठ संघांचा पराभव करून तुम्ही फायनल मॅच जिंकता तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो, असे रोहित म्हणाला.
भारतीय संघाने २००७ साली जेव्हा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा रोहित त्या संघात होता. पण २०११च्या वर्ल्ड कप विजेतेपदावेळी रोहित संघात नव्हता.
वाचा-
रोहितच्या मते भारतीय संघाकडे मोठी संधी आहे. तीन पैकी एक वनडे वर्ल्ड कप आणि दोन टी-२० वर्ल्ड कप आहेत. आपल्याला किमान दोन कप जिंकावे लागतील.
२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाकडून रोहितने ५ शतकं केली होती. सेमीफायनलमध्ये रोहित लवकर बाद झाला. तर विराट कोहली आणि केएल राहुल देखील फार काही करू शकले नाहीत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times