नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांना परतीचा प्रवास सुरू झाला आहे. या लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय राज्य सरकार तसेच काही लोक वैयक्तीक पातळीवर करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक जण विविध ठिकाणी अडकलेल्या मजूरांसाठी मदत करत आहे. अशातच भारतीय संघातील एक माजी खेळाडू या लोकांसाठी स्वत: जेवण करत आहे.

वाचा-

भारतीय फुटबॉल संघातील माजी खेळाडू आय एम विजयन सध्या त्रिशूर शहरातून गावी परतणाऱ्या मजूरांसाठी जेवण तयार करून देत आहे. ९०च्या दशकात भारतीय फुटबॉल गाजवणाऱ्या वियजनला चित्रपटात काम करण्यापासून ते जेवण तयार करणे या गोष्टी कधीच अडथळा वाटल्या नाहीत.

वाचा-

भारताच्या हा माजी कर्णधार त्रिशूर शहरात वाढला आणि तेथेच फुटबॉल शिकला. विजयन सध्या केरळ पोलिस दलातील एक जवान म्हणून जबाबदारी पार पाडत आहे.

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा त्याला कळाले की जवळपास ५० एक मजूर प्रवासी जे बंगालमधील आहेत आणि त्रिशूर शहरात अडकले आहेत. तेव्हा तो काही मित्रांसह या सर्वांना जेवण करून देत आहे. स्वत: विजयनला पिठ मळता येते आणि रोटी देखील करता येते.

वाचा-
राज्य सरकार अडकलेल्या लोकांसाठी मदत करत आहे. पण मी आणि माझ्या मित्रांनी रोज ५० हून अधिक लोकांच्या जेवणाची जबाबदारी घेतली. आम्ही रोज त्यांच्यासाठी जेवण करतो, असे विजयनने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

यासाठी माझ्या मित्राने त्याची स्वयंपाक घर दिले आहे. आम्ही सर्वजण मिळून तेथेच जेवण करतो. आम्ही खूप चांगला स्वंयपाक करत नसलो तरी रोज वेगवेगळे जेवण देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे विजयन म्हणाला.

लोक येथे अडकून पडले आहेत. त्यांच्या स्वत:च्या घरापासून दूर आहेत. सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करत असले तरी आम्ही आमच्यापरीने त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here