सिडनी: ज्या दिवशी भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळण्याचे बंद करेल त्या दिवशी त्याचा शेवट होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपल यांनी व्यक्त केले. भारताचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या चॅपल यांनी कसोटी क्रिकेटबाबत काळजी व्यक्त करताना हे मत मांडले. त्याच बरोबर त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचे कौतुक केले. धोनी हा सर्वोत्तम फिनिशर असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा-
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांशिवाय अन्य कोणताही असा देश दिसत नाही जो युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन देतो. माझा टी-२० क्रिकेटला विरोध नाही. ते सहजपणे टिकेल. भारताचा कर्णधार विराट कोहलीने देखील कसोटी हा सर्वोत्तम प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यामुळेच हा प्रकार टिकेल असे वाटते. कसोटीत तुम्ही गोलंदाज आणि फलंदाज यांची खरी परीक्षा करू शकता, असे चॅपल म्हणाले.

वाचा-
भारताने मदत केली नाही तर कसोटी क्रिकेट संपले. करोना व्हायरस संपल्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरू करण्यात भारत महत्त्वाची भूमिका पार पाडेल, अशी आशा चॅपल यांनी व्यक्त केली.

वाचा-
प्ले राइट फाऊंडेशनच्या एका लाइव्ह चॅट मध्ये चॅपल यांनी धोनीचे भरभरून कौतुक केले. चॅपल भारताचे प्रशिक्षक असताना धोनीने १८३ धावांची खेळी केली होती. धोनी कोणत्याही चेंडूवर षटकार मारू शकतो. तो सर्वात शक्तीशाली फलंदाज आहे आणि निश्चितपणे जगातील सर्वोत्तम फिनिशर, असे चॅपल म्हणाले.

वाचा-
चॅपल दोन वर्ष भारताचे प्रशिक्षक होते. सचिन तेंडुलकरने ‘प्लेइग इट माय वे’ या पुस्तकात चॅपल यांना एक रिंगमास्टर असल्याचे म्हटले होते. चॅपल भारताचे प्रशिक्षक होण्याआधी लक्ष्याचा पाठलाग करताना रेकॉर्ड खराब होते. पण त्यानंतर एका वर्षात भारताने १७ सामने जिंकले. त्यांच्या कार्यकाळात भारताने वेस्ट इंडिजमध्ये ३५ वर्षानंतर मालिका जिंकली. तसेच दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी विजय मिळवला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here