करोना व्हायरसचा प्रकोप जगभरा सुरु आहे. करोना व्हायरसशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात येत आहे. गेल्या महिन्याभरापासून एक खेळाडू करोना व्हायरसशी झुंज देत होता, पण आज अखेर त्याचा हा लढा अपयशी ठरला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला.

करोना व्हायरसमुळे एखाद्या युवा खेळाडूचे निधन होणे, ही वेदनायादायी गोष्ट आहे. कारण हा खेळाडू २८ वर्षांचा होता. एक खेळाडू असल्याने त्याचा फिटनेस चांगलाच होता. पण करोना व्हायरसच्या जाळ्यात अडकल्यावर या युवा खेळाडूलाही आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या महिन्याभरापासून या खेळाडूची करोना व्हायरसशी लढा सुरु होता. त्यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले. या दरम्यान त्याचे अवयव निकामी होत गेले आणि आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या या निधनामुळे क्रीडा जगतामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

महिन्याभरापूर्वी त्याला करोना झाला आहे, हे समजले होते. साधारण ४-५ एप्रिल दरम्यान या खेळाडूला ताप आला होता. त्यावेळी बऱ्याच हॉस्पिटलने त्याला प्रवेश नाकारला होता. त्यानंतर ८ एप्रिलला जेव्हा त्याला खोकला आला आणि या त्यामधून रक्त बाहेर पडले तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

नेमके घडले तरी काय…या युवा खेळाडूला सुरुवातीला ताप आला होता. त्यानंतर खोकल्यामधून रक्त बाहेर पडले आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर या खेळाडूची करोना व्हायरसची चाचणी करण्यात आली. सुरुवातीला केलेल्या चाचणीमध्ये तो निगेटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा करोना चाचणी करण्यात आली तेव्हा त्याला करोना झाल्याचे समजले.

हा खेळाडू आहे तरी कोण…करोना व्हायरसमुळे निधन झालेला हा खेळाडू जपानचा आहे. जपानमध्ये सुमो कुस्ती ही प्रसिद्ध आहे. ही सुमो कुस्ती खेळणारा २८ वर्षांचा हा मल्ल असून त्याचे नाव शोबूशी असे आहे. तो तगादागावा या संघाकडून जपानमध्ये सुमो कुस्ती खेळत होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here