पाहा रोहित शर्माच्या गंमतीशीर गप्पा

या व्हिडीओमध्ये रोहित आणि सुर्या आपल्या एका जुन्या सहकाऱ्याशी गप्पा मारताना दिसत आहेत. सुरुवातीला त्याला विश्वासच बसत नव्हता की खुद्द रोहित शर्मा त्याच्यासोबत गप्पा मारतोय. रोहित आपल्यासोबत ऑनलाईन आहे ही गोष्ट तो आपल्या कुटुंबीयांना मोठ्या आनंदाने सांगतोय. त्यानंतर तो आपल्या घरातील क्रिकेट ट्रॉफीज वगैरे दाखवतो. आणि त्याच दरम्यान शिवाजी महाराजांची मुर्ती देखील या ट्रॉफीजच्या शेजारी दिसते. ही मुर्ती पाहताच रोहित सावध झाला अन् त्याने महाराजांच्या नावाची घोषणा केली. Ind vs Wi: पावसानं रोखलं पहिलं शकत, भडकलेल्या शुभमन गिलवर Memesची बरसात
श्रीलंकेतील आशिया चषक आता कुठे खेळवणार?

श्रीलंका क्रिकेटने आशियाई क्रिकेट परिषदेला (एससीसी) कळवले होते की, देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे बोर्ड आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या आयोजन करण्याच्या स्थितीत नाही. सध्याच्या संकटामुळे श्रीलंका क्रिकेटने अलीकडेच लंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पा पुढे ढकलला होता. ऑगस्ट महिन्यात आशिया चषक स्पर्धा खेळवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला होता. आशिया चषक स्पर्धा ही २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. आता ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times