ढाका: करोना व्हायरसला क्रीडा क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. सर्व प्रकारची काळजी घेऊन सुद्ध क्रिकेटमध्ये करोनाने प्रवेश केला आहे. बांगलादेशच्या क्रिकेट संघातील एका प्रशिक्षकाला करोनाची लागण झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार संघाचे डेव्हलपमेंट कोच यांना करोनाची लागण झाली.

वाचा-
अन्य देशांप्रमाणे बांगलादेशमध्ये देखील करोचा रुग्णांची संख्या वाढत आहे. आशिकुर रहमान देखील यापासून वाचू शकले नाहीत. करोनाची लागण झाल्याची माहिती स्वत: आशिकुर रहमान यांनी दिली. १२ मे रोजी दुपारी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल ११ मे रोजी माझा करोना चाचणीचा रिपोर्ट आला होता. रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे म्हटले होते, असे रहमान यांनी क्रिकबझला सांगितले.

वाचा-
मला पहिला वाटले नाही की करोनाची लागण झाली आहे. पण नंतर हळूहळू ताप आला, मग छातीत दुखू लागले. डॉक्टरांकडे गेल्यावर करोना चाचणी घेण्यात आली, असे रहमान म्हणाले.

वाचा-
जगभरात ४२ लाखहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ लाक ९० हजार इतकी आहे. बांगलादेशमध्ये करोनाचे १६ हजार ६६० रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २५० जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here