सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे. करोना व्हायरसमुळे हे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी लोकं आपल्या घरीच आहेत. घरात बसून लोकं काही नाही काही करताना दिसत आहेत. बरीचं लोकं घरी बसून व्हिडीओ बनून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, असा एक टिकटॉकचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये एका दुकानदाराकडे एक व्यक्ती सामानांची यादी घेऊन येतो. चही यादी तो दुकानदाराला देतो. पण या व्यक्तीने लिस्टमध्ये नेमके का लिहिले आहे, हे दुकानदाराला कळत नाही. पण दुकानदार या लिस्टमधील सामान काय आहे, ते वाचायचा प्रयत्न करतो. या लिस्टमधील एका सामनाचा प्रकार वाचताना दुकानदार चक्क सानिया मिर्झा ट्राउझर… असे वाचतो… हे ऐकून दुकानात आलेल्या व्यक्तीला धक्का बसतो. पण यावेळी तो आपले हसूही आवरू शकत नाही.
हा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत थेट सानिया मिर्झापर्यंतही पोहोचला आहे. सानियाने हा व्हिडीओ पाहिला आणि तिलाही हसू आवरता आले नाही त्यामुळे तिनेही हा व्हिडीओ रिशेअर करत आपले मतही व्यक्त केले आहे.
सानियावरील हा टीक-टॉकचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही हा व्हिडीओ अजूनपर्यंत पाहिला नसेल तर नक्कीच पाहा. कारण सध्याच्या घडीला लोकं काय बघत आहेत, काय व्हायरल होत आहे आणि लोकं आपले मनोरंजन कसे करून घेत आहेत, हे तुम्हाला समजू शकेल. त्यामुळे एकदा तरी हसण्यासाठी हा व्हिडीओ नक्कीच पाहायला हवा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times