लॉकडाऊनच्या काळात मोदी सरकाने काही महत्वाचे निर्णय घेत लोकांना दिलासा दिला आहे, अशा शब्दांत भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने सरकारचे कौतुक केले आहे.

मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यानंतर काही जणांनी सरकारवर टीका केली होती. मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’या संकल्पनेवर बऱ्याच जणांची त्यांना ट्रोलही केले. पण सध्याच्या घडीला मोदी सरकाने देशवासियांसाठी नेमके कोणते महत्वाचे निर्णय घेत त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे, हे सांगितले आहे.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी लघु उद्योगांना कोणत्याही गॅरेंटी शिवाय तीन लाखांचे कर्ज देण्याची घोषणा केली. एमएसएमईसाठी ३.३ लाख कोटी कर्ज आणि इक्विटी फंड जाहीर करण्यात आला आहे, याचा फायदा ५० लाख युनिटना होऊ शकतो. इपीएफमधून दिलेल्या दोन्हीही सवलती खेळते भांडवल व कर्मचाऱ्याच्या हातात पडणारा पैसा याच्या दृष्टीने नक्कीच उपयोगी ठरतील, असे म्हटले जात आहे. टीडीएसची मर्यादा २५ टक्के कमी केल्याने बाजारातील खेळत्या भांडवलात ५० हजार कोटींनी वाढ होऊ शकते.

आतापर्यंत सरकारने जी काही महत्वाची पावले उचलली, याबाबत गंभीरने एका ट्विटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. सरकारने ज्या उपाय योजना सांगितल्या आहेत, त्या गंभीरने पुन्हा एकदा सर्वांपुढे आणल्या आहेत.

बुधवारी पॅकेजच्या पहिल्या भागाचा तपशील त्यांनी दिला होता. यामध्ये आर्थिक तणावात असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख उद्योगांना फायदा होईल. सुस्थितीत असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये भांडवल गुंतवणुकीसाठी ५० हजार कोटींचा निधी १० हजार कोटींच्या कॉर्पससह स्थापन करण्यात आला आहे. त्याचा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना लाभ होईल. या उद्योगांच्या आकार आणि क्षमतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची व्याख्या बदलण्यात आली आहे. या उद्योगांचा आकार वाढला तरी त्यांना पूर्वीचे लाभ मिळत राहतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here