वाचा-
जर्मनीमध्ये करोना लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सवलत दिल्यानंतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुरू झाले आहे. मैदानावर खेळाडू परतले आहे. पण स्टेडियममध्ये खरे प्रेक्षक नव्हते. आयोजकांनी चाहत्यांची कमतरता दूर करण्यासाठी मैदानावर हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांचे फोटो लावले आहेत.
वाचा-
जर्मनीतील बोरसिया पार्क स्टेडियमवरील सर्व खुर्च्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्याचे फोटो चिटकवण्यात आले आहेत. जर मैदानातून पाहिले तर खरोखर प्रेक्षक बसल्याचा आभास होतो. अर्थात हे सर्व प्रेक्षक मूक आहेत आणि मैदानात एखाद्या खेळाडूने गोल मारला तर जल्लोष करणारे कोणी नाही.
वाचा-
करोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व स्पर्धा बंद केल्या होत्या. जवळ जवळ ३ महिन्यांनी आरोग्य सुरक्षेची काळजी घेऊन खेळ सुरू झाला आहे.
बोरसिया पार्क स्टेडियमवरील अनेक विंगमध्ये प्रेक्षक बसलेले तुम्हाला दिसतील. अर्थात ज्या प्रमाणे खेळाडू मैदानावर परतण्यास उत्सुक आहेत; त्याच प्रमाणे चाहते देखील सामना पाहण्यास उत्सुक आहेत. पण अशा संकट काळात घरी बसण्याशिवाय कोणताही पर्याय त्यांच्याकडे नाही. जोपर्यंत करोना संकट जात नाही तोपर्यंत प्रेक्षकांना मैदानावर येण्याची परवानगी मिळणार नाही.
याच धर्तीवर आता क्रिकेटमध्ये सामना कधी सुरू होतो आणि त्यामध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी मिळते का ? याची उत्सुकता लागली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप बाबत विविध पर्यायांचा विचार सध्या सुरू आहे. याबाबत अनेक खेळाडूंनी त्यांची मते व्यक्त केली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times