करोना व्हायरसचे थैमान सध्याच्या घडीला जगभरात सुरु आहे. जगभराील लोकं या करोना व्हायरसमुळे हैराण झाली आहेत. त्यामुळे काही जणं या व्हायरसला दुषणंही देत आहेत. पण करोना व्हायरसमध्ये एक सकारात्मक संदेश लपलाय, असं जर तुम्हाला सांगितलं तर…

जगभरात जवळपास ४४ लाख लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी जवळपास २ लाख ९७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १५ लाख लोकांकावर यशस्वी उपचार झाले असून सध्याच्या घडीला २५ लाख लोकांवर उपचार सुरु आहेत. भारतामध्येही करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. कारण भारतात जवळपास ७८ हजार लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे, तर २,५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील २६ हजार लोकांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहे, तर ४९ हजार लोकांवर उपचार सुरु आहेत.

जगभरात लाखो लोक करोना व्हायरसमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे करोना व्हायरसमध्ये एखादा सकारात्मक संदेश असेल, असे तुम्हाला वाटत नसेल. सध्याच्या घडीला बरीच लोकं आपल्या घरी आहेत, जास्त वाहनं रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच गोष्टीची बचत झालेली पाहायला मिळत आहे. या करोना व्हायरसने एक सकारात्मक संदेश दिला आहे, असे मत भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले आहे. करोना व्हायरसमध्ये काय सकारात्मक आहे, याबद्दल रोहितने नेमके काय सांगितले आहे ते जाणून घेऊया…

याबाबत रोहित शर्मा म्हणतो की, ” करोना व्हायरस हा आपल्या आयुष्यात एखाद्या वादळासारखा आला आणि त्यामुळे सर्व गोष्टी बाधित झाल्या आहेत. पण जर आपण या गोष्टीला सकारात्मकपणे पाहिले तर यामध्ये आपल्याला एक संदेश पाहायला मिळेल. आपण जर असा विचार केला की, धरणी माता चांगले ठेवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात आहे. जर तुम्हाला चांगले आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही निसर्गाला वाचवायला हवे. हाच संदेश या करोना व्हायरसच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मकपणे घेता येऊ शकतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here