क्रिकेट चाहत्यांसाठी सध्या एक आनंदाची बातमी आली आहे. २२ मे पासून क्रिकेटची लीग सुरु होणार असून आता चाहत्यांना लाइव्ह क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे एकही क्रिकेटची स्पर्धा सुरु नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सध्या एकही लाइव्ह सामना बघता येत नाहीए. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराशही झाले आहेत. पण त्यांची ही निराशा लवकरच संपणार आहे. कारण काही दिवसांतच आता क्रिकेटची लीग सुरु होणार आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबरपासून ट्वेन्टी-२० विश्वचषक सुरु होणार होता. पण आता करोना व्हायरसमुळे हा विश्वचषक होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. या विश्वचषकापूर्वी आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच आयपीएलबाबती एक गूड न्यूज तुम्हाला मिळू शकते. पण सध्या २२ मे पासून वेस्ट इंडिजमध्ये एका क्रिकेट लीगला सुरुवात होणार आहे. या लीगमध्ये काही नावाजलेले खेळाडूही खेळणार आहेत. त्यामुळे आता या लीगची उत्सुकता संपूर्ण क्रिकेट विश्वाला असेल.

कोणती लीग सुरु होणारवेस्ट इंडिजमध्ये २२ मेपासून आता विंन्सी प्रीमिअर लीग सुरु होणार आहे. या लीगमध्ये १० दिवसांत ३० सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा १० षटकांची असेल. या स्पर्धेचे आयोजन सेंट विंन्सेंट येथे २२ ते ३१ मे या कालावधीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत काही दिग्गज खेळाडूही सामील होणार आहेत.

याबाबत सेंट विंन्सेंट क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. शॅलोव्ह यांनी सांगितले की, ” मला तुम्हाला ही गोष्ट सांगताना आनंद होत आहे की, विंन्सी प्रीमिअर लीग आम्ही २२ मेपासून सुरु करत आहोत. या लीगमध्ये बरेच आंतरराष्ट्रीय खेळाडूही खेळणार आहेत. ही लीग २२ मे ते ३१ मे या कालावधीत होणार आहे. या लीगमध्ये दिवसाला तीन सामने पाहण्याचा आनंद चाहत्यांना घेता येणार आहे. त्यामुळे या लीगचा उदंड प्रतिसाद मिळेल, अशी मला आशा आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here