commonwealth games, CWG 2022 : सहज जिंकणारा सामना भारताने गमावला, ऑस्ट्रेलियाची राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार सलामी – australia beat indian women’s cricket team by3 wickets in commonwealth games 2022 in birmingham
Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: Jul 29, 2022, 6:34 PM
भारताने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर शेफाली वर्माने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे भारताला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ४८ धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
सौजन्य-ट्विटर
बर्मिंगहम : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. पण त्यांना सहज जिंकणारा सामना गमवावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. पण भारताची वेगवान गोलंदा रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच चार धक्के दिले आणि भारताला विजयाची आशा दाखवली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेघ गार्डनरने ३५ चेंडूंत नाबाद ५२ धावांची धडेकाबाज खेळी साकारली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला भारतावर तीन विकेट्स राखून विजय मिळवता आला..
भारताने या सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर शेफाली वर्माने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे भारताला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली. शेफालीने ३३ चेंडूंत ९ चौकारांच्या जोरावर ४८ धावांची दमदार खेळी साकारली. शेफाली चबाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी ही कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर कौरने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि भारतीय संघालाही १५० धावांचा टप्पा गाठून दिला. कौरने यावेळी ३४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. कौरच्या या ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना १५४ धावा केल्या. भारताच्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के बसत गेले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार फलंदाजांना यावेळी रेणुका ठाकूरने स्वस्तात बाद केले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या संघाची अवस्था ही ४ बाद ३४ अशी झाली होती. रेणुकाने यावेळी चार षटकांमध्ये १८ धावा देत चार विकेट्स मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची गार्डनर आणि हॅरिस यांची चांगली जोडी जमली होती. पण भारताच्या मेघना सिंगने ग्रेस हॅरिसला ३७ धावांवर बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची अॅशलेघ गार्डनर ही अखेरच्या षटकांमध्ये खेळपट्टीवर उभी होती आणि ऑस्ट्रेलियाला विजयाची आशा तिच्याकडूनच होती व तिनेच अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.
Quality and professional excellence for companies, families and private individuals in Portugal and Espanha https://social.msdn.microsoft.com/Profile/iMartinez Official tennis player profile of Pedro Martinez on the ATP Tour. Featuring news, bio, rankings, playing activity, coach, stats, win-loss
Medicament information leaflet. Cautions.
cialis super active
All news about pills. Read here.
Quality and professional excellence for companies, families and private individuals in Portugal and Espanha https://social.msdn.microsoft.com/Profile/iMartinez Official tennis player profile of Pedro Martinez on the ATP Tour. Featuring news, bio, rankings, playing activity, coach, stats, win-loss