गेल्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शमी अर्ज पाठवण्याचे ठरले होते. यावेळी अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांचाही अर्ज बीसीसीआय केंद्र सरकारला अर्जुन पुरस्कारासाठी पाठवणार होती. पण बुमराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वर्षे पूर्ण न झाल्यामुळे त्याचा अर्ज अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आला नाही. दुसरीकडे बायकोच्या कनेक्शनमुळे शमीचा अर्जही बीसीसीआयने केंद्र सरकारला पाठवला नाही.
अर्जुन पुरस्कारासाठी काही निकष आणि काही नियम असतात. शमी हा अर्जुन पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये बसत आहे. कारण तीन वर्षे त्याला भारताकडून खेळून झाली आहेत, त्याचबरोबर त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. पण काही नियमांमध्ये शमी हा बसत नाही आणि यासाठी कारण ठरली आहे त्याची पत्नी हसीन जहा. हसीनने असे नेमके काय केले आहे जेणेकरून लायक असतानाही शमीला अर्जुन पुरस्कार मिळू शकत नाही, याचा विचार तुम्ही करत असाल…
शमीची पत्नी हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि हुंडा मिळवण्यासाठी बायकोला मारहाण, असे गंभीर आरोप केले होते. शमीच्या विरोधात पोलिस स्थानकात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यायालयात याचिकाही दाखल केली गेली आहे. ज्या खेळाडूवर आरोप असतील आणि केस सुरु असेल त्याला अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरवता येऊ शकत नाही. त्यामुळे लायक असूनही बीसीसीआयने त्याचा अर्ज केंद्र सरकारला अर्जुन पुरस्कारासाठी पाठवलेला नाही. त्यामुळे फक्त बायकोच्या तक्रारीमुळे शमी हा अर्जुन पुरस्कारापासून वंचित राहीलेला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times