या फोटोमध्ये सचिनबरोबर भारताचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली असल्याचे तुम्हाला पाहायला मिळाले असेल. त्याचबरोबर या फोटोत सचिन आणि सौरव काही पदार्थ खात असल्याचेही दिसत आहे. नेमकी ही गोष्ट आहे तरी काय आणि सचिनने आत्ता हा फोटो का शेअर केला, जाणून घ्या…
सचिन आणि गांगुली यांची सलामीवीराची चांगली जोडी होती. या दोघांमध्ये चांगला समन्वय होता, त्याचबरोबर हे दोघे चांगले मित्रही होते. त्यावेळी जेव्हा एका कोणाच्या शहरात सामना असेल तेव्हा ते एकमेकांच्या घरी जेवायला जायचे. सचिन असाच एकदा गांगुलीच्या घरी जेवायला गेला होता आणि त्या आठवणी सचिनने एका फोटोच्या माध्यमातून पुन्हा जागृत केल्या आहेत.
हा फोटो शेअर करून सचिन थोडासा भावूक झाला आहे. कारण या जुन्या आठवणींमध्ये तो पुन्हा एकदा रमला आहे. सचिन म्हणला की, ” गांगुलीच्या घरी एका सायंकाळी काढलेला हा फोटो आहे. गांगुलीच्या घरी त्याची आई आणि कुटुंबिय चांगले पदार्थ आम्हाला खायला द्यायचे आणि चांगले आदरतिथ्य करायचे. मला आशा आहे की, गांगुलीच्या आईची तब्येत अजूनही चांगली असेल, माझ्या तिला शुभेच्छा.”
आयसीसीने एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सचिन आणि सौरव यांनी सलामीला येत विश्वविक्रम रचला होता, या गोष्टीची आठवण करून दिली होती. आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ” सचिन आणि सौरव यांनी सलामीला १७६ सामने एकत्र खेळले. या १७६ सामन्यांमध्ये सचिन आणि सौरव यांनी ८२२७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाही सलामीच्या जोडीा सहा हजार धावांचा पल्लाही ओलांडता आला नसल्याचे आयसीसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times