आपल्या घराबाहेर पोलिस आले आहेत आणि ते आपल्याला बोलवत आहेत, असे समजले तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा एखादा वाईट विचार डोक्यात येऊ शकतो. कारण सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे पोलिस जे घराबाहेर पडत आहेत किंवा ज्यांच्याकडून सरकारचे नियम पाळले जात नाहीत, त्यांना चांगलाच प्रसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काहीवेळा सुरक्षिततेचा उपाय म्हणून वैद्यकीय कर्मचारीही पोलिसांना घेऊन काही ठिकाणी करोनाची चाचणी करायला जात आहे. त्यामुळे पोलिसांची फौज आपल्या घराबाहेर आली आहे आणि ते आपल्याला बोलत आहेत, हे ऐकल्यावर कोणाचाही काळजाचा ठोका चुकू शकतो.
पोलिसांनी मेरी यांना बाहेर येण्याची विनंती केली. तेव्हा नेमके काय घडत आहे हे तिला कळत नव्हते. त्यामुळे आता पोलिस नेमके काय करणार, हे तिला समजत नव्हते. पोलिसांनी मेरी यांना घराबाहेर बोलावले आणि जो विचार मेरी यांनी केला नव्हता, तेच पाहायला मिळाले.
पोलिसांनी मेरीला घराबाहेर बोलवले. त्याचबरोबर तिच्या मुलालाही घराबाहेर बोलवले आणि त्यांना एक सरप्राईज दिले. पोलिस यांनी मेरीच्या मुलासाठी केक आणला होता. कारण मेरीचा लहान मुलगा प्रिन्स याचा आज वाढदिवस होता. त्यामुळे तुघलक रोड पोलिस स्टेशन येथील दलाने मेरीला एक सरप्राईज दिले आणि मेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. यानंतर मेरीने पोलिस दलाचे आणि त्यांच्या आतापर्यांतच्या लॉकडाऊनच्या कामाचे कौतुक केले.
मेरीने याबाबतचा एक व्हिडीओही आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये पोलिस दलातील काही कर्मचारी त्यांच्या घरी येताना दिसत आहेत. त्याच़बरोबर पोलिसांनी यावेळी मुलासाठी कसा केक आणला आणि कसे सेलिब्रेशन केले, हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times