वाचा-
आजपासून ७२ वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यातील धावांचा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. एका प्रथम श्रेणी सामन्यात दिवसभरात किती धावा होऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचे उत्तर किती धावा द्याल. सध्याचा वेग पाहता क्रिकेट चाहते याचे उत्तर ३०० किंवा ४०० धावा असे देतील. पण १९४८ साली झालेल्या सामन्यात एका दिवशी ७२१ धावा झाल्या होत्या.
वाचा-
करण्याचा पराक्रम करणारा संघ होता ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी इंग्लंडच्या काऊंटी एसेक्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ७२१ धावा केल्या. सदन ऑन सी मैदानावर झालेल्या सामन्यात १५ मे १९४८ रोजी ऑस्ट्रेलियाने १२९ षटकात या धावा केल्या होत्या. क्रिकेटमध्ये हा विक्रम कदाचितच एखाद संघ मोडू शकले. या डावात यांनी १२५ मिनिटात १८७, लॉक्सटन यांनी १२०, सॅगर्स यांनी नाबाद १०४, बिली ब्राऊन यांनी १५३ तर बार्नेस यांनी ७९ धावा केल्या होत्या.
वाचा-
सामन्यातील दुसऱ्या दिवशी एसेक्सचा पहिला डाव ८३ तर दुसरा डाव १८७ धावांवर संपुष्ठात आला आणि ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ४५१ धावांनी हा सामना जिंकला.
सध्या करोना व्हायरसमुळे सर्व क्रिकेट सामने स्थगित करण्यात आले आहेत. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. आता सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे ते ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपवर. या स्पर्धेचे आयोजन कशा पद्धतीने करावे यासंदर्भात आतापासूनच विचार सुरू आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times