वाचा-
सचिनने स्पार्टन कंपनीवर आरोप केला होता की, त्यांनी करारात उल्लेख करण्यात आलेल्या नियमांचे पालन केले नाही. तसेच रॉयल्टी म्हणून जे पैसे देणे अपेक्षित होते ते ही दिले नाहीत. दोघांमधील करार संपल्यानंतर देखील आपल्या नावाचा वापर कंपनीने केल्याचे आरोप त्याने केला होता.
सचिनने मुंबई आणि लंडनमध्ये अनेक प्रमोशन कार्यक्रम केले. या काळात त्याने अन्य कोणत्याही कंपनीसोबत करार केला नाही. आणि त्याचे अधिकारी कुणाल शर्मा तसेच लेस गलाब्रेथ यांनी कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले. याशिवाय सचिन तेंडुलकरचा ट्रेड मार्क ज्यात तो स्क्वेअर कट खेळताना दिसत आहे तो रद्द करण्याची मागणी केली होती.
वाचा-
कोर्टात स्पार्टन कंपनीने त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य केले आणि कोर्टाचे आदेश मान्य करण्याची तयारी दाखवली. कोर्टाने कंपनीला सचिनचे नाव आणि फोटो याचा वापर करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर सचिनचा फोटो असलेला ट्रेडमार्क रद्द करण्यास सांगितले आहे.
वाचा-
स्पार्टन कंपनी सचिनच्या सोबतचा करार प्रामाणिकपणे करण्यात अपयशी ठरली. यासाठी आम्ही माफी मागतो. हे प्रकरण मिटवण्यात सचिनने दाखवलेल्या धैर्य याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. स्पार्टन कंपनी सार्वजनिकरित्या मान्य करते की आमचा आणि सचिनचा काहीही संबंध नाही, असे लेस गॅलब्रेथ यांनी सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times