वाचा-
आजच्या दिवशी २०१७ मध्ये दीप्ती आणि पूनम यांनी आयर्लंडविरुद्ध पोटशेफस्ट्रॉममध्ये ३२० धावांची विक्रमी भागादीरी केली होती. महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागिदारी आहे. भारतीय संघाकडून दिप्ती शर्माचे हे पहिले आंतरराष्ट्रीय शतक होते. या शतकी खेळीमुळे दिप्तीचे नाव झाले. तिने विक्रमी २७ चौकारांसह १८८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ब्लॅडा क्लार्क (२१९) नंतर महिला क्रिकेटमधील ही सर्वोच्च धाव संख्या आहे.
भारताच्या या दोन्ही खेळाडूंनी ४५.३ षटकात ३२० धावा केल्या. पूनम राऊतने १६६ चेंडूत १०९ धावा केल्या तर शर्माने १६० चेंडूत २७ चौकार आणि २ षटकारांसह १८८ धावा. याशिवाय शिखा पांडेने २७ धावा केल्या.
वाचा-
वाचा–
पूनम आणि दिप्तीच्या या खेळीमुळे भारताने ५० षटकात २ बाद ३५८ धावा केल्या. बदल्यात आयर्लंडचा डाव ४० षटकात १०९ धावात संपुष्ठात आला. भारताने या सामन्यात २४९ धावांनी विजय मिळवला. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने ४, तर शिखा पांडेने ३ विकेट घेतल्या.
पूनम आणि दिप्ती यांनी जेव्हा हा विक्रम केला तेव्हा महिला आणि पुरूष क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठीची ती सर्वोच्च भागिदारी होती. या दोघांनी केलेली भागिदारी पुरषांच्या क्रिकेटमधील कोणत्याही जोडीला करता आली नव्हती. त्यानंतर दोन वर्षांनी वेस्ट इंडिजच्या शाय होप आणि जॉन कॅम्पबेल यांनी आयर्लंडविरुद्ध पहिल्या विकेटसाठी ३६५ धावांची भागिदारी करून हा विक्रम मागे टाकला. अर्थात महिला क्रिकेटमध्ये आज देखील पूनम आणि दिप्तीचा विक्रम कायम आहे.
भारतीय क्रिकेटचा विचार करता पुरूष आणि महिलांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही पहिल्या विकेटसाठीची सर्वोच्च भागिदारी आहे. पुरुषांमध्ये सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी पहिल्या विकेटसाठी २५८ धावांची भागिदारी केली आहे. तर सचिन आणि राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी ३३१ धावांची भागिदारी केली होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times