लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या धावपटूवर उपासमारीची वेळ आली आहे. एक वेळच्या जेवणाचीही तिला शाश्वती नाही. कारण तिचे वडिल आजारी असून अंथरुणाला खिळून आहे. दुसरीकडे आईचा रोजगारही गेला असून ती बेरोजगार झाली आहे. त्यामुळे घरात पैशांची चणचण असून आता एका वेळचं पोट कसं भरायचं हा प्रश्न तिच्यापुढे पडला आहे.

करोना व्हायरसमुळे भारतामध्ये लॉकडाऊन आहे. आता लॉकडाऊन अजून वाढण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता अशा लोकांनी आपले पोट कसे भरायचे, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.

प्राजक्ता गोडबोले. महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय धावपटू. इटलीमध्ये २०१९ साली झालेल्या मॅरेथॉनमध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याचबरोबर भुवनेश्वरर येथे झालेल्या अर्ध मॅरोथॉनमध्ये तिने दुसरे स्थानही पटकावले होते. भारताला आगामी काळात ऑलिम्पिकच्या पदकाची आशा तिच्यापासून आहे. पण खेळाडूंना जो पोषक आहार मिळायला हवा, तो तर सोडाच पण प्राजक्तावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

प्राजक्ताचे वडिल सुरक्षारक्षकाचे काम करायचे, पण प्राजक्ताच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे ते अंथरूणाला खिळून असतात. प्राजक्ताची आई जेवण बनवण्याचे काम करून महिन्याला ५-६ हजार कमावत होती. पण लॉकडाऊनच्या काळात लग्नकार्य होताना दिसत नाहीत. त्यामुळे सध्या ती बेरोजगार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आपल्या दोन वेळच्या पोटाची सोय कशी करायची आणि वडिलांचे उपचार कसे करायचे, हा मोठा प्रश्चन प्राजक्ताला पडलेला आहे.

याबद्दल प्राजक्ता म्हणाली की, ” लॉकडाऊनने आमचे आयुष्य बेचिराख केले आहे. एक क्रूर खेळ आमच्याबरोबर सुरु आहे. कारण सध्याच्या घडीला घरची परिस्थिती फारच बिकट आहे. मी सरावही करू शकत नाही. सध्या शेजारी आम्हाला मदत करत आहेत. तांदूळ, डाळ आणि जीवनावश्यक गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला मिळत आहेत. पण हे काही दिवसांपुरता ठीक आहे, त्यानंतर आम्ही करायचे काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here