सर्वात तरुण भारतीय वेटलिफ्टर्सपैकी एक

संकेतने मागील वर्षी पटियाला इथे झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नवा विक्रम नोंदवला होता. त्याशिवाय संकेतने ताश्कंद इथे झालेल्या २०२१ कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं. यातूनच तो बर्मिंगहॅममध्ये २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भाग घेणारा संकेत सर्वात तरुण भारतीय वेटलिफ्टर्सपैकी एक आहे. त्याने यंदा पहिल्यांदाच कॉमनवेल्थ स्पर्धेत भाग घेत पहिल्याच प्रयत्नात रौप्य पदकाची कामगिरी केली.

अगदी थोडक्यात हुकलं सुवर्ण पदक

मागील वर्षी गोल्ड कोस्ट इथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सतीश शिवलिंगम आणि आर. व्यंकट राहुल यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं. संकेतकडूनही सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, पण तो जखमी झाल्याने अगदी शेवटच्या फेरीत वजन उचलू शकला नाही. त्यामुळेच त्यांचं सुवर्ण पदक अगदी थोडक्यात हुकलं. १९५० मध्ये पहिल्यांदा या खेळांमध्ये वेटलिफ्टिंगचा समावेश करण्यात आला होता. आता भारताला या खेळातून मोठ्या कामगिरीची, अधिक पदकांची आशा आहे.

मेडिकल टीमकडून संकेतची तपासणी

दुसऱ्या फेरीत दोन अटेंपमध्ये संकेत जखमी झाला. दुसऱ्या अटेंपमध्ये त्याला १३९ किलो वजन उचलायचं होतं, पण उचलू शकला नाही, त्याचवेळी तो जखमी झाला. मेडिकल टीमकडून संकेतची तपासणी करुन त्याला लगेचच उपचार दिले गेले. त्यानंतर तो तिसऱ्या अटेंपसाठी तयार झाला. तिसऱ्यावेळीही संकेतने १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा जखमी झाला. यात त्याच सुवर्ण पदक हुकलं आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. हेही वाचा – CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत मराठीचा डंका, भारताला पहिलं पदक, सांगलीच्या संकेतला सिल्व्हर मेडल!

शेवटच्या क्षणी वजनाचा लोड…क्रॅक झाल्याचा आवाज

संकेतकडून सुवर्ण पदकाचीच आशा होती, पण अखेरच्या दोन प्रयत्नात तो जखमी झाला आणि सुवर्ण पदकाची संधी गमावली. स्पर्धेत रौप्य जिंकल्याचा थोडा आनंद आहे पण दु:ख त्याहून अधिक असल्याचं संकेतने सांगितलं. शेवटच्या क्षणी वजनाचा लोड आला आणि क्रॅक झाल्याचा आवाज आला. डॉक्टरांनी गॅप पडली असल्याचं सांगितलं असून आता एक्स-रे करण्यात येणार असल्याचं त्याने सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्याऱ्या वीरांना हे पदक त्याने समर्पित केलं आहे.

मागील वर्षी वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्ण पदकं

या स्पर्धेत मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद अनिकने १४२ किलो क्लीयर जर्कसह एकूण २४९ किलो वजन उचलत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. मागील वर्षी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्ण पदकांसह नऊ पदकं कमावली होती. आता ६१ किलो वजनी गटात पी गुरुराजा, ४९ किलो वजनी गटात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानू आणि ५५ किलो वजनी गटात बिंदियारानी देवी या पदकाच्या शर्यतीत असतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here