भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाचा अंतिम सामना वानखेडे स्डेडिमवर झाला होता. आता याच वानखेडे स्टेडियममध्ये क्वारंटाइनची सुविधा मिळणार असल्याचे दिसत आहे. कारण यासंदर्भातील एक पत्र मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पाठवले आहे. याबाबत एमसीए पालिकेला पूर्णपणे सहकार्य करणार आहे.

आज मुंबई महानगरपालिकेने एमसीएला एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी काही कालावधीसाठी वानखेडे स्टेडियमचे हक्क आम्हाला देण्यात यावेत, आम्हाला काही रुग्णांना क्वारंटाइन करण्यााठी आणि अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही वास्तू हवी आहे, असे म्हटले आहे. या पत्रानंतर एमसीए पालिकेला पूर्णपणे पाठिंबा देणार आहे.

याबाबत एमसीएचे सचिव संजय नाईक यांनी सांगितले की, ” एमसीएला पालिकेने आज एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आम्हाला रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी वानखेडे स्टेडियम देण्यात यावे, अशी विनंती केली आहे. आम्ही मुंबई पालिकेला वानखेडे स्टेडियम देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करणं, हे आमचं काम आहे. सरकारसाठी आम्हाला जी काही मदत करता येईल ती आम्ही नक्कीच करू. सरकारबरोबर आम्ही नक्कीच आहोत.”

भारताने २०११ साली विश्वचषक याच वानखेडे मैदानावर उचलला होता. आता हे मैदान लॉकडाऊनच्या काळात सरकारला मदत करण्यासाठी एमसीएने खुले केले आहे आणि सरकारला सर्वतोपरी मदत करण्यात ते तयार आहेत.

महाराष्ट्रात शुक्रवारी ४९
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३४ रुग्ण मुंबईतील आहेत. राज्यातील करोनाबळींची एकूण संख्या १ हजार ०६८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे १ हजार ५७६ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या २९ हजार १०० झाली आहे. त्याचवेळी दिवसभरात ५०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात करोना रुग्ण दुपटीचा वेग ११ दिवसांवर आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री
यांनी दिली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here