वाचा-
टीम इंडियाकडून आतापर्यंत ज्या सहा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-२०च्या पदार्पणातच सामनावीर पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये दिनेश कार्तिक, प्रज्ञान ओझा, एस बद्रीनाथ, अक्षर पटेल. बरिंदर सरन आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. यातील नवदीप सैनीचा अपवाद वगळता बाकी सर्व जण भारतीय संघातून बाहेर आहेत.
दिनेश कार्तिकने करिअरचा पहिला टी-२० सामना २००६ मध्ये खेळला होता तर अखेरचा फेब्रुवारी २०१९ मध्ये. प्रज्ञान ओझाने २००९ साली पहिला टी-२० सामना खेळला होता. या पहिल्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध ४ विकेट घेत सामनावीर पुरस्कार मिळवला.
वाचा-
एस बद्रीनाथने टीम इंडियाकडून एकच टी-२० मॅच खेळली आहे. त्यानंतर पुन्हा कधी त्याला संधी दिली गेली नाही. या एकमेव सामन्यात त्याने ४३ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर क्रमांक येते अक्षर पटेल याचा, त्याने २०१५ साली टी-२० मध्ये पदार्पण केले आणि सामनावीर पुरस्कार मिळवला.
वाचा-
बरिंदर सरन याने दोन टी-२० सामने खेळले आहेत. त्यातील पहिल्या सामन्यात त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला. तर दुसऱ्या सामन्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले. टीम इंडियाकडून पदार्पणात सामनावीर पुरस्कार पटकावणारा अखेरचा खेळाडू नवदीप सैनी आहे. त्याने गेल्या वर्षी पहिल्याच सामन्यात ३ विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times