मुंबई: क्रिकेटमध्ये अशी एक वेळ होती जेव्हा मालिका जिंकल्यानंतर खेळाडू विजयाची आठवण म्हणून स्टंप्स सोबत घेऊन जायचे. पण आता त्यावर बंदी घातली आहे. कारण या स्टंप्समध्ये मायक्रोफोनसह अन्य उपकरणे जोडली गेली असतात. या स्टंप्सची किमत लाखोंच्या घरात असते. अर्थात इतक्या दिवसात तुम्हालाही याचा अंदाज आलाच असेल. पण आज आम्ही तुम्हाला क्रिकेटमधील अशी एक गोष्टी सांगणार आहोत जी वाचल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल.

वाचा-
स्टंप्समध्ये लावण्यात आलेले मायक्रोफोन आणि कॅमेरा यामुळे याच्या किमती निश्चितपणे जास्त असतील याबद्दल तुमच्या मनात शंका नसेलच. पण या स्टंप्सवर लावण्यात आलेल्या बेल्सची किमत किती असेल याचा तुम्हाला काही अंदाज आहे का? सध्याच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या बेल्सला जरा स्पर्श केला तरी त्यावरील लाईट सुरू होतात.

वाचा-
जुन्या बेल्सचा वापर करत असताना असे अनेकदा झाले आहे की, चेंडू लागल्यानंतर देखील बेल्स तशाच स्टंप्सवर राहिल्या आणि नियमानुसार जोपर्यंत बेल्स खाली पडत नाहीत तोपर्यंत फलंदाज बाद होत नाही. पण काळ बदलला आणि देखील. नव्या बेल्समुळे अंपायर आणि विरुद्ध संघाचे काम सोपे झाले. अर्थात क्रिकेटमधील बेल्स पडल्यानंतर फलंदाजाला बाद देण्याचा नियम तसाच आहे.

वाचा-
तर विषय होता बेल्सच्या किमतीचा. सध्याच्या काळात वापरण्यात येणाऱ्या क्रिकेट बेल्सची किमत एका आयफोन इतकी आहे. होय तुम्हाला वाचून धक्का बसेल. एका बेल्सची किमत एक लाख १० हजार रुपये इतकी आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंच्या स्टंप्सवर वापरण्यात येणाऱ्या चार बेल्सची किमत ४ लाख ४० हजार इतकी होते.

वाचा-
जिल्हा स्तरावर होणाऱ्या क्रिकेट सामन्यात एका बेल्सची किमत जवळपास १०० रुपये इतकी असते. तर आंतरराष्ट्रीय सामन्यात एक लाखपेक्षा जास्त. म्हणूनच आयसीसीकडून सामना जिंकल्यानंतर घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here