मुंबई: करोना व्हायरसची लागण रोखण्यासाठी सर्व जण घरीच थांबले आहेत. याला क्रिकेटपटू देखील अपवाद नाहीत. घरी बसलेले हे क्रिकेटपटू एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देत आहेत. असेच एक चॅलेंज काही दिवसांपूर्वी भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिले होते. आता सचिनने चॅलेंज पूर्ण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतक नव्हे तर त्याने युवीला त्याने दिलेल्या चॅलेंजपेक्षा अवघड असे चॅलेंज रिटर्नमध्ये दिले आहे.

युवराज सिंगने काही दिवसांपूर्वी बॅट विशिष्ट पद्धतीने पकडून त्यावर चेंडू जास्तीत जास्त वेळा चेंडू हवेत ठेवण्याचे
keep it up चॅलेंज दिले होते. युवीने हे चॅलेंज सचिन, रोहित शर्मा आणि हरभजन सिंगला दिले होते. याचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हा तो म्हणाला होता सचिनला हे सहज शक्य आहे. रोहितला जमेल पण हजभजनसाठी अवघड असेल.

हे होते युवराजचे चॅलेंज

वाचा-
आता सचिनने युवराजने दिलेले फक्त स्विकारले नाही तर ते आणखी अवघड करून पूर्ण केले. हे चॅलेंज पूर्ण केल्याचा व्हिडिओ सचिनने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने डोळ्यावर काळ्या कापडाने एक पट्टी बांधून बॅटच्या एजने चेंडू टॅप केला. युवी डोळे उघडे ठेवून चेंडू टॅप केला होता.

वाचा-
चेंडू टॅप करताना सचिन म्हणतो, युवी तुमने मुझे बहुत ही आसान विकल्प दिया था, लेकिन मैं तुझे थो़ड़ा मुश्किल चैलेंज दे रहा हूं और इसे करने के लिए तुम्हें नामित कर रहा हूं. कमऑन डू इट फॉर मी.

वाचा-

सचिनचे उत्तर…

त्यानंतर सचिनने दुसरा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने युवराजला हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी एक आयडिया देखील सांगितली आहे. ज्या पद्धतीने सचिनने हे चॅलेंज पूर्ण केले आहे. त्यावरून येत्या काही दिवसात जगभरात ते लोकप्रिय होईल यात शंका नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here