काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काश्मीरबद्दल काही वक्तव्यं केलं होतं. या वक्तव्याचा समाचार भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने घेतला आहे. यावेळी गंभीरने आफ्रिदीने चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

काश्मीरबद्दल बोलताना आफ्रिदीची जीभर घसरली होती. त्याने भारतासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले होते. काश्मीरमधील लोकांनी आतापर्यं किती हाल सहन केले, याबद्दल आफ्रिदी म्हणाला होता. हे सर्व बोलून भारतामुळे काश्मीरची कशी वाताहत झाली आहे, हे आफ्रिदीने जगाला सांगायचे होते. पण आफ्रिदीला गंभीरने चांगलेच धारेवर धरले आहे. त्याचबरोबर त्याच्या बेताल वक्तव्यांचा समाचारही घेतला आहे.

नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत. कारण त्यांनी सात लाख सैन्य फक्त काश्मीरमध्येच ठेवले आहे. आमच्या देशाचा विचार केला तर पाकिस्तानात मिळून सात लाखांचे सैन्य आहे. त्यांच्या मागे आमचे २० कोटी लोकांचे सैन्यही आहेच, असे वक्तव्य आफ्रिदीने केले होते. त्यानंतर गंभीरने आफ्रिदीला चांगलेच उत्तर दिले आहे. यावेळी गंभीरने पाकिस्तानला बांगालेदशबाबत नेमके काय झाले, याचीही आठवण करून दिली आहे.

गंभीर म्हणाला की, ” पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना? ”

काश्मीरबाबत भाराताची प्रतिमा मलीन करण्याच काम पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूंनी केले आहे. इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंची भारतावर होणार टीका वाढलेली आहे. काश्मीबाबत वक्तव्य करून आफ्रिदीला भारत काश्मीरची काहीच काळजी घेत नाही, हे दाखवून द्यायचे असून जगभरात भारताची प्रतिमा मलीन करण्याचे काम तो करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here