करोना व्हायरसमुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे काही लोकांचे प्रचंड हाल झाले. काही लोकं बेरोजगार झाले तर काहींवर उपासमीरीची वेळ आली. पण या लॉकडाऊनने बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत, असे भारताचा धडाकेबाज सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला वाटते.

भारतामध्ये सध्या चौथा लॉकडाऊन सुरु झाला आहे. आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना घराबाहेर पडता येत होते, कामावर जाता येत होते. पण चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

वाचा-

चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात एकही स्पर्धा चाहत्यांना पाहता आली नव्हती. त्याचबरोबर आपले आवडते खेळाडू नेमके काय करत आहेत, हेदेखील चाहत्यांना कळत नव्हते.

वाचा-

लॉकडाऊनमध्ये नेमके काय शिकायला मिळाले, याबाबत रोहित शर्मा म्हणाला की, ” कोणीही गोष्ट शिकायला वेळ, काळ नसतो. आपण सतत काही ना काही शिकत असतो. माझ्यासाठी तर लॉकडाऊनचा काळ हा चांगला आहे. कारण या काळात मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. मी माझी पत्नी रिकिता आणि तिच्या सहवासाबद्दल काही गोष्टी समजू शकलो आहे. या काळाने मला दाखवून दिले की, आतापर्यंत मी कोणत्या गोष्टी करू शकलो नाही किंवा मला करता आल्या नाहीत. जेव्हा आम्ही दोघे एकत्र नव्हतो. तेव्हा नेमके मी काय मिस केले, हे आता मला समजत आहे.”

करोना व्हायरसने एक सकारात्मक संदेश दिला आहे, असे मत भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले आहे. करोना व्हायरसमुळे नेमके काय सकारात्मक बदल पाहायला मिळालेले आहेत, याबाबत रोहितने आपले मत व्यक्त केले आहे. रोहितने याबाबत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहित जे काही म्हणाला आहे, ते वाचल्यावर तुम्हालाही ही गोष्ट पटेल. करोना व्हायरसमध्ये काय सकारात्मक आहे, याबद्दल रोहितने नेमके काय सांगितले आहे ते जाणून घेऊया…

रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, ” करोना व्हायरस हा आपल्या आयुष्यात एखाद्या वादळासारखा आला आणि त्यामुळे सर्व गोष्टी बाधित झाल्या आहेत. पण जर आपण या गोष्टीला सकारात्मकपणे पाहिले तर यामध्ये आपल्याला एक संदेश पाहायला मिळेल. आपण जर असा विचार केला की, धरणी माता चांगले ठेवण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात आहे. जर तुम्हाला चांगले आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही निसर्गाला वाचवायला हवे. हाच संदेश या करोना व्हायरसच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मकपणे घेता येऊ शकतो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here