चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सुरु होणाऱ्या काही गोष्टींमुळे खेळाडूंना हायसे वाटणार असून त्यांच्यासह चाहतेही खूष होणार आहे.
वाचा-
गेल्या दोन महिन्याच्या काळात एकही स्पर्धा चाहत्यांना पाहता आली नव्हती. त्याचबरोबर आपले आवडते खेळाडू नेमके काय करत आहेत, हेदेखील चाहत्यांना कळत नव्हते. पण आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये चाहत्यांना या साऱ्या गोष्टी पाहता येणार आहेत कारण आता क्रीडा क्षेत्रावरील बंधन थोडी शिथील करण्यात आली आहेत.
लॉकडाऊनमुळे खेळाडूंनी एकत्र येऊ नये, असे म्हटले होते. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरीच होते. पण आता मात्र असे होताना दिसणार नाही. कारण चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
वाचा –
चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धा भरवता येऊ शकतात. त्यामुळेच चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी असेल. स्टेडिमबरोबरच क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार आहेत, जेणेकरून खेळाडूंना सराव करता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल. पण हे दोन महत्वाचे निर्णय झाले असले तरी एक मोठा निर्णय मात्र अजून होऊ शकलेला नाही.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा संकुले आणि स्टेडियम्स खुली करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही चांगली बातमी आहे. पण हे निर्णय जरी झाले असले तरी स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांना एंट्री मात्र नाकारण्यात आली आहे. जरी एखादी स्पर्धा भरवली तरी त्यासाठी अजूनपर्यंत तरी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times