नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अजब आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे. नुकतेच त्याने काश्मीर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावरून भारतीय क्रिकेटपटूंनी त्याचा समाचार घेतला होता. आता आफ्रिदीने असे काही वक्तव्य केले आहे की जे वाचल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.

वाचा-
एका प्रश्नाला उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला, माझ्या आयुष्यावर जर चित्रपट काढला तर त्यातील इंग्रजी भागात टॉम क्रूझ तर ऊर्दू भागात आमिर खान यांनी माझी भूमिका करावी. आता आफ्रिदीच्या या उत्तरावर भारतीय नेटिझन्स त्याला ट्रोल करत आहेत.

एका भारतीय युझरने तर आफ्रिदीला सांगितले, पाकिस्तान दोन वेळा विकला तरी आमिर खानच्या अभिनयासाठीचे पैसे देऊ शकणार नाही. तर दुसऱ्या एका युझरने सोबत चित्रपट केला तर पाकिस्तान विकला तरी पैसे कमी पडतील, असे म्हटले.

वाचा

आणखी एका युझरने तर चित्रपटाची कथाच सांगितली आहे. चित्रपटाच्या पहिल्या सीनमध्ये आफ्रिदी फलंदाजीसाठी उतरतो आणि पहिल्याच चेंडूवर बाद होतो. शेवटच्या सीनमध्ये आफ्रिदी फलंदाजीला येतो आणि पुन्हा शून्यावर बाद होतो. चित्रपट संपला. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एका बाजूला पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यात आता बायोपिकमध्ये टॉम क्रूज पाहिजे असे म्हटल्यामुळे भारतीय नेटिझन्स त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.

काय म्हणाला होता आफ्रिदी मोदींबद्दल…

सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here