भारतामध्ये तबलिगी जमातने करोना सर्वात जास्त पसरवला, असे म्हटले जात आहे. देशामधील तबलिगी जमातच्या लोकांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. या तबलिगी जमातशी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा संबंध आहे, अशी माहिती आता पुढे आली आहे.

वाचा-

दिल्लीमध्ये तबलिगी जमातच्या काही लोकांचा एक कार्यक्रम झाला. त्यावेळी भारतात करोना व्हायरस पसरलेला होता. त्याचबरोबर देशामध्ये लॉकडाऊनही सुरु होते. पण तरीही तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी दिली गेली आणि त्यानंतर ते भारताच्या विविध राज्यांमध्ये गेले. तबलिगी जमातच्या काही लोकांना करोना झाला होता आणि त्यांच्यामुळे भारतात त्याचा प्रसार झाला, असे म्हटले जात आहे. त्यामुळे तबलिगी जमातवर भारतात टीका होत आहे. तबलिगी जमात यांचा दिल्लीमध्ये एक कार्यक्रम दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी झाला. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोकं उपस्थित होती. संचारबंदी असताना एवढी लोकं एकत्र कशी काय जमली, यावर जोरदार टीका झाली.

एका अहवालामध्ये सांगण्यात आले आहे की, आफ्रिदी हा तबलिगी जमातचा अनुयायी आहे. तबलिगी जमातमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या आफ्रिदीला मान्य असतात. आफ्रिदीबरोबर बरेच पाकिस्तानचे खेळाडू तबलिगी जमातचे अनुयायी असल्याचे आता पुढे आले आहे. आफ्रिदीसह पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक, मोहम्मद युसूफ, साकलेन मुश्ताक, मुश्ताक अहमद हे तबलिगी जमातचे अनुयायी असल्याचे एका अहवालात म्हटले गेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हाशिम अमला हादेखील तबलिगी जमातचा अनुयायी असल्याची बाब आता पुढे आली आहे.

वाचा-

करोनामुळे भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. चीनमधून सुरूवात झालेल्या लाखो जणांचा मृत्यू झाला. यापासून बचाव करण्यासाठी देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या दरम्यान भारताची कुस्तीपटू बबीता फोगाटने ‘तबलिगी जमात’ संदर्भात एक ट्विट केले होते. अर्जुन पुरस्कार विजेत्या बबीताने, करोना व्हायरस भारताची दुसरी मोठी समस्या आहे. तर ‘तबलिगी जमात’ ही अद्याप नंबर एकवर आहे. तिच्या या ट्विटवरून अनेकांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here