वाचा-
यांनी १५ नोव्हेंबर १९६९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्द कानपूर कसोटीत पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात ते शून्यावर बाद झाले. तर दुसऱ्या डावात त्यंनी शतकी खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या गुंडप्पा यांना पहिल्या डावात भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी १३७ धावांची खेळी केली. अशी कामगिरी करणारे गुंडप्पा हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत.
वाचा-
गुंडप्पा यांनी रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. या सामन्यात आंध्र प्रदेशच्या संघाविरुद्ध त्यांनी २३० धावा केल्या होत्या. त्यांनी भारतीय संघाकडून ९१ कसोटी सामन्यात १४ शतक आणि ३५ अर्धशतकांसह ६ हजार ९० धावा केल्या. तर २५ वनडेत २ अर्धशतक केली. गुंडप्पा यांनी ज्या-ज्या सामन्यात शतक झळकावले, त्या-त्या सामन्यात भारताचा कधीच पराभव झाला नाही. त्यांनी पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते, तो अर्निर्णित ठरला होता. त्यानंतर त्यांनी शतकी खेळी केलेले सगळे सामने भारत जिंकला होता.
पाहा-
गुंडप्पा विश्वनाथ यांनी दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. यातील एका सामना अनिर्णित ठरला होता तर एका सामन्यात भारताचा पराभव झाला होता.
वाचा-
खिलाडूवृत्तीसाठी प्रसिद्ध
१९७९-८० साली एका कसोटी सामन्यात इंग्लंडच्या टेलर नावाच्या फलंदाजाला अम्पायरने बाद दिले होते. पण टेलर बाद नसल्याचे गुंडप्पा यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्याला परत बोलावले. तो सामना भारत हरला होता. मात्र, गुंडप्पांच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक झाले होते. तरुण खेळाडूंना संधी देण्यासाठी ते अनेकदा मागे राहत असत.
वाचा-
गुंडप्पा विश्वनाथ यांना १९७९मध्ये ‘अर्जुन अवार्ड’नं सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर १९८३मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही ते बीसीसीआयमध्ये विविध पदांवर सक्रिय राहिले. २००९मध्ये त्यांना बीसीसीआयच्या जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नंतर बीसीसीआयच्या निवड समितीवरही त्यांनी काम केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times